हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या ‘सच कहूँ तो’ या आत्मचरित्राचे प्रकाशन अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. आपल्या आत्मचरित्रात नीना गुप्ता यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, कास्टिंग काऊचचे अनुभव अशा अनेक गोष्टींबाबत लिहिले आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर लोकांच्या हरतऱ्हेच्या प्रतिक्रिया येणार याची कल्पना आहे, मात्र आता मी जे लिहिले आहे त्यावरून लोक माझ्याबाबतीत काहीतरी तर्कवितर्क करतील, भलाबुरा विचार करतील अशा गोष्टींची भीती मला उरलेली नाही. त्यापलीकडे जात मला माझे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवता आले याचा आनंद जास्त आहे, अशी भावना गुप्ता यांनी व्यक्त केली.

गेले दीड वर्ष करोनामुळे झालेल्या टाळेबंदीने चित्रीकरणाची कामे रखडली. या काळात नीना गुप्ता यांनी आपले आत्मचरित्र लिहून पूर्ण के ले. करीनाच्या हस्ते ‘सच कहूँ तो’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. नीना गुप्ता यांनी २०१७ मध्ये आपल्याला चांगले चित्रपट करायची इच्छा आहे, पण कोणी कामच देत नाही, अशी भावना समाजमाध्यमांवरून व्यक्त के ली होती. त्यानंतर त्यांना ‘बधाई हो’सारख्या चित्रपटात भूमिका मिळाली. या भूमिके साठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे नामांकन मिळाले होते, याचा उल्लेख करत करीनाने त्यांच्या कारकीर्दीतील नव्या टप्प्याचे कौतुक केले. त्यावर या घटनेचे आपल्यालाही आश्चार्य

वाटते, मात्र कधीच काम करायला न मिळण्यापेक्षा आता या वयात ज्या चांगल्या भूमिका करायला मिळत आहेत, त्याचे समाधान जास्त असल्याचे नीना गुप्ता यांनी सांगितले. आयुष्यातील बराचसा काळ एकटे राहावे लागल्याची खंत वाटत आली आहे. मात्र एकाकीपणामुळे किं वा मनासारखे काम मिळत नाही म्हणून निराश झाले नाही किं वा दारूचे व्यसन, नैराश्य अशा टोकाच्या गोष्टीतही कधीच अडकले नाही, असे त्यांनी स्पष्ट के ले.

‘मला साधे-सरळ आयुष्य, नवरा-मुले, सासू-सासरे असे माणसांनी भरलेले घर-संसार हवा होता, पण तसे आयुष्य वाट्याला आलेच नाही. लग्नही ठरले होते, मात्र ऐन लग्नाच्या वेळी त्या माणसाने पाठ फिरवली. त्यामागचे कारण आजही कळलेले नाही. आज ती व्यक्ती सुखासमाधानाने संसार करते आहे. कदाचित त्या व्यक्तीलाही हे पुस्तक वाचल्यावर आपली भावना लक्षात येईल. वकिलाच्या सल्ल्यावरून अनेक जणांची खरी नावे आत्मचरित्रात देण्यात आलेली नाहीत. या आत्मचरित्राचा दुसरा भाग लिहावासा वाटलाच तर ते त्या माणसांच्या खऱ्या नावासकट लिहिण्याचे धाडस आपल्या अंगी येईल. -नीना गुप्ता