News Flash

Photo : ‘रंगीला राजा’ फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित; गोविंदा दुहेरी भूमिकेत

बॉलिवूडचा 'हिरो नंबर १' अर्थात अभिनेता गोविंदा तब्बल २५ वर्षांनंतर निर्माता आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यासोबत काम करणार आहे.

गोविंदा

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर १’ अर्थात अभिनेता गोविंदा तब्बल २५ वर्षांनंतर निर्माता आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्यासोबत काम करणार आहे. ‘इल्जाम’, ‘शोला और शबनम’ आणि ‘आँखे’ या चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर आता ‘रंगीला राजा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये गोविंदा दुहेरी भूमिका साकारणार आहे.

‘रंगीला राजा’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सध्या त्याचीच चर्चा आहे. तरुणींच्या घोळक्यातील अवलिया अंदाजात गोविंदा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. दुहेरी भूमिकेसह तो या चित्रपटात चार विविध व्यक्तिरेखा साकारणार आहे. विशेष म्हणजे योगगुरू बाबा रामदेव आणि फरार विजय मल्ल्या या दोन व्यक्तिरेखा तो साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.
या चित्रपटात गोविंदासोबत मिशिका चौरसिया, अनुपमा अग्निहोत्री आणि दिगांगना सुर्यवंशी यांच्या भूमिका आहेत. राजस्थानमध्ये चित्रपटाची शूटिंग झाली असून प्रदर्शनाची तारिख अद्याप जाहीर झाली नाही.

‘राजा बाबू’, ‘आंटी नंबर १’, ‘बडे मिया छोटो मिया’ असे एकपेक्षा एक हिट चित्रपट गोविंदाने केले. हल्लीच्या ‘हप्पी एडिंग’, ‘किल दिल’ यांसारख्या चित्रपटातही त्यानं काम केलं पण यात गोविंदाच्या भूमिकेची फारशी चर्चा झाली नव्हती. तेव्हा पहलाज यांचा हा चित्रपट गोविंदाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर ‘नंबर वन’ बनवेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2018 6:27 pm

Web Title: first look poster of rangeela raja released govinda will be seen in a double role
Next Stories
1 ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ कार्यक्रमाद्वारे मकरंद अनासपुरे मारणार या व्यक्तींशी गप्पा
2 Bigg Boss 12 : माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल आणि अनुप जलोटा यांचं नातं माहित आहे का?
3 वेबकिंग सुमित व्यासने बांधली लग्नगाठ
Just Now!
X