आजच्या इंग्रजाळलेल्या मराठी तरुणाईला भुरळ घालणारा मराठमोळा रॅपर म्हणजे श्रेयस जाधव. आपल्या हिप हॉप साँग्सने प्रेक्षकांना भुलवणारा श्रेयस केवळ एक रॅपर नसून तो उत्तम निर्मातादेखील आहे. ‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाची निर्मिती त्याने केली आहे. विशेष म्हणजे त्याने मी पण सचिन या चित्रपटाच्या माध्यमातून तो दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही प्रेक्षकांच्या समोर आलं. त्यामुळे मराठी कलाविश्वात स्वत:च्या नावाचं एक वलय तयार केल्यानंतर श्रेयसने आता त्याचा मोर्चा हिंदी कलाविश्वाकडे वळविला आहे.

छोड दो या हिंदी रोमँण्टीक हिप हॉप अल्बमच्या माध्यमातून त्याने हिंदी कलाविश्वात पदार्पण केलं आहे.  “छोड दे” हे हिंदी हिप हॉप सॉन्ग दि किंग जे. डी आणि गणराज प्रोडकशन्स निर्मित असून बाली हे या गाण्याचे गीतकार आहेत. तसंच श्रेयश स्वरसाज या गाण्याला लाभला आहे. दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार याने केले असून एखादी प्रेम कहाणी प्रस्तावानंतर अगदी तिच्यासोबतच्या अनोख्या पद्धतीने केलेल्या लग्नापर्यंत कशी पूर्णत्वास जाते या आशयाला अनुसरून हे गाणं आहे. हिंदी कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या श्रेयसच्या या अल्बम साँगचं चित्रीकरण युरोपमधील अर्मेनिया येथे झालं आहे.

“माझी नाळ मराठीशी जोडलेली आहे. या आधी मी उत्तमोत्तम मराठी गाणी, रॅप्स, चित्रपट केले आहेत. ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मला मराठी भाषेपुरतं मर्यादित न राहता हिंदीमध्ये काही तरी उत्तमच घेऊन पदार्पण करायचं होत. “छोड दे” च्या शूटच्या ठिकाणापासून पासून ते अगदी शेवट लग्नाच्या विशिष्ट मांडणीपर्यंत मी छोड दे ला नाविन्यपूर्ण रूपात प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला सांगायला अत्यानंद होतो कि प्रेक्षकांनी माझ्या या नव्या “छोड दे” ला ही भरघोस प्रतिसाद दिला आहे. असच प्रेम मला या ही पुढे माझ्या प्रेक्षकांकडून मिळत राहील अशी आशा आहे.”असं श्रेयस म्हणाला.