08 December 2019

News Flash

‘फोर मोअर शॉट्स प्लिज’ वेब सीरिजमुळे ‘ही’ अभिनेत्री यशाच्या शिखरावर

हिच अभिनेत्री येणार आणखी एका वेबसिरीजमधून समोर

‘फोर मोअर शॉट्स प्लिज’ या नवीन वेब सीरिजला मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे अभिनेत्री मानवी गगरू सध्या यशाच्या शिखरावर आहे. ही गुणी अभिनेत्री सध्या वेब क्वीनचे बिरुद मिरवत आहे. अॅमेझॉन प्राइमच्या या डिजिटल शोमधील मानवीची सिद्धी पटेल ही भूमिका घराघरांत चर्चेचा विषय बनली आहे. चार तरुण मुली, शहरी महिलांमधील गुंतागुंतीचे नाते, वर्क-लाइफ बॅलन्स, महत्त्वाकांक्षा आणि त्यातून येणारे दडपण अशा अनेक विषयांवर ही सीरिज आधारित आहे.

मानवीने साकारलेली एका गुजराती तरुणीची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावत आहे. या सीरिजमधील तिच्या बोल्ड आणि बिनधास्त कामाबद्दल तिची तरुणाईकडून विशेष प्रशंसा होत आहे. या शोला इतके मोठे यश मिळत असताना आता मानवी प्रेक्षकांसाठी ‘ट्रीपलिंग २’च्या माध्यमातून आणखीन एक मोठे सरप्राईज घेऊन येत आहे. हाही एक वेब शो असून लोकप्रिय अशा तिच्या ट्रीपलिंगचा तो दुसरा सिझन आहे. अलीकडेच ट्रीपलिंग २चे पोस्टर लाँच करण्यात आले. सोशल मीडियावर त्याला तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. टीव्हीएफच्या ट्रीपलिंगमधील चंचल असो किंवा पिचर्समधील श्रेया, मानवीने आजवर सगळ्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. युट्युबच्या विविध वेब सीरिजमधून सगळ्यांची मने जिंकणारी ही अभिनेत्री ‘तमाश्री डेट्स अ टोमॅटो’, ‘द स्पर्म गर्ल’ अशा प्रेक्षकांकडून कौतुक मिळवणाऱ्या अनेक लघुपटांत काम करुन पुढे आली.

First Published on February 11, 2019 6:16 pm

Web Title: fore more shots please web series manavi gagru success
Just Now!
X