महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्य दैवताची चाहूल आता प्रत्येकाला लागली आहे. त्यामुळे सध्या घराघरामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरु झाली आहे. यंदा देशावर करोनाचं संकट असल्यामुळे प्रत्येक जण साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करणार आहेत. मात्र तरीदेखील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असल्याचं दिसून येत आहे. यातच अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने इको-फ्रेंडली बाप्पाची मुर्ती तयार केली आहे.

प्रार्थनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती गणपती बाप्पाची इको-फ्रेंडली मुर्ती तयार करताना दिसत आहे. प्रार्थनाने शाडूच्या मातीपासून बाप्पाची सुबक मुर्ती तयार केली आहे. त्यामुळे अनेकांनी प्रार्थनाचं कौतूक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

ॐ गं गणपतये नमः

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on


दरम्यान, या पूर्वी प्रार्थनाने गणपतीची मुर्ती घडवितांनाचे काही फोटो शेअर केले होते. या लॉकडाउनच्या काळाचा सदुपयोग करुन तिने बाप्पाची सेवा केल्यामुळे कलाविश्वातूनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.