बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी अनेकांमध्येच कुतूहल पाहायला मिळते. काही कलाकारांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेताना अशा काही गोष्टी समोर येतात ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावतात. अभिनेत्री नेहा शर्माच्या बाबतीतही तसेच झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नेहा शर्माचे वडील काँग्रेसचे आमदार आहेत. बिहार पोटनिवडणुकीत भागलपूर भागात ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून उभे राहिले होते. त्यांना आरजेडी आणि जेडीयूचा पाठिंबाही मिळाला होता.

नेहाच्या वडिलांच्या या राजकीय पार्श्वभूमीविषयी फार कमी जणांना माहिती आहे. विधानसभा निवडणुकीतही नेहा शर्मा आणि तिची बहीण आएशा शर्मा या दोघींनी आपल्या वडिलांसाठी प्रचार केला होता. त्यावेळी या दोन्ही अभिनेत्रींना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या या दोन्ही बहिणी सध्या बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख बनवू पाहात आहेत. यामध्ये नेहाने बऱ्यापैकी यशही मिळवले आहे.

https://www.instagram.com/p/BaHV0F3FqVo/

पाहा : VIDEO : ‘घुमर’ करत दीपिका म्हणतेय ‘दिसला गं बाई दिसला’

२०१० मध्ये मोहित सूरीच्या ‘क्रूक’ या चित्रपटातून नेहाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. जॅकी भगनानीसोबत ती ‘यंगिस्तान’ चित्रपटातही झळकली होती. अभिनयासोबतच नेहा राजकारणातही आपल्या वडिलांची साथ देताना दिसली होती. भागलपूरच्या माऊंट कॉर्मेल शाळेत शिकलेल्या नेहाने नवी दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ फॅशन अॅण्ड टेक्नॉलॉजी’मधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. कुणाल कोहलीच्या ‘तेरी मेरी कहानी’ आणि एकता कपूरच्या ‘क्या सुपरकूल है हम’ या चित्रपटातूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.