News Flash

अक्षय-करिनाची जोडी देणार ‘गुड न्युज’

यापूर्वी २००२ मध्ये मेघना गुलजार यांनी सरोगेसीवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली होती.

‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणा-या करण जोहरने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. धर्मा प्रोडक्शनअंतर्गत तयार करण्यात आलेला प्रत्येक चित्रपट हिट ठरला असून या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. त्यामुळे करण आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवीन चित्रपट घेऊन येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून करिना आणि अक्षय यांची जोडी तब्बल नऊ वर्षानंतर एकत्र झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आता निश्चित करण्यात आलं आहे.

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातून चंदेरी दुनियेत पुन्हा कमबॅक करणारी करिना कपूर आता पूर्वीसारखी चित्रपटसृष्टीत सक्रिय झाली आहे. त्यामुळे ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटानंतर ती करण जोहरच्या आगामी चित्रपटामध्ये झळकून येणार आहे. तर करिनाबरोबर अक्षयकुमारही स्क्रिन शेअर करणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचं नाव निश्चित झालं असून करणने ट्वीटरवरुन ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

करिना- अक्षयच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘गुड न्युज’ असं असून हा चित्रपट १९ जुलै २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची कथा सरोगेसीवर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे. यापूर्वी २००२ मध्ये मेघना गुलजार यांनी सरोगेसीवर आधारित चित्रपटाची निर्मिती केली होती. त्याचं नाव ‘फिलहाल’ असं होतं.

राज मेहता दिग्दर्शित ‘गुड न्युज’ हा चित्रपट दोन कुटुंबांच्या वैवाहिक जीवनावर आधारित असून यात करिना आईची भूमिका साकारणार आहे. तर अक्षय करिनाच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून महत्वाचा संदेश देण्याबरोबरच रोमॅन्टिक आणि कॉमेडीचा देखील समावेश करण्यात आला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 2:12 pm

Web Title: good news akshay kumar and kareena kapoor new film gets a title
Next Stories
1 सिनेरसिकांसाठी मेजवानी, या शुक्रवारी प्रदर्शित होणार चार चित्रपट
2 ..जेव्हा रणबीर- बिग बी ‘डेट’ला जातात तेव्हा
3 चाहत्यांच्या प्रेमामुळे आजच्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला – अमिताभ बच्चन
Just Now!
X