News Flash

Gunjan Saxena Trailer: कारगिल युद्धातील पराक्रमाची कथा

पराक्रमी महिलेची प्रेरणादायी कथा

अभिनेत्री जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित आहे. नुकताच या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे.

“सुशांतच्या वडिलांकडे त्याचा फोन नंबर नव्हता”; अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

कारगिल युद्धात गुंजन सक्सेना यांनी फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवलं होतं. लढाऊ विमान उडवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या होत्या. दरम्यान युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं होतं. त्यांच्या या साहसाची एक झलक आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“दान नकोय आम्हाला काम हवय”; जेष्ठ अभिनेत्री महाराष्ट्र सरकारवर संतापल्या

‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीता कुमार आणि मानव विज हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत. अंगद चित्रपटात जान्हवीच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 11:39 am

Web Title: gunjan saxena the kargil girl official trailer netflix india mppg 94
Next Stories
1 सुशांतच्या बहिणीने केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती
2 बॉबी देओलचे वेब विश्वात पदार्पण, सीरिजमधील फर्स्ट लूक प्रदर्शित
3 व्हायरल झालेल्या व्हिडीओवर रिया चक्रवर्तीचे स्पष्टीकरण, म्हणाली…
Just Now!
X