News Flash

मिलिंद सोमणने शेअर केला न्यूड फोटो, म्हणाला…

...म्हणून मिलिंदने शेअर केला न्यूड फोटो

देशातील पहिला पुरुष सुपर मॉडल म्हणून अभिनेता मिलिंद सोमणकडे पाहिलं जातं. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद आज फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे बऱ्याचदा तो सोशल मीडियावर त्याच्या वर्कआऊटचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र, यावेळी त्याने स्वत: न्यूड फोटो शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची एकच चर्चा रंगली आहे.

आज मिलिंदचा वाढदिवस असून त्याने इन्स्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला आहे. यात तो बीचवर धावताना दिसत आहे. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीदेखील त्याने असाच एक न्यूड फोटो शेअर केला होता.

 

View this post on Instagram

 

Happy birthday to me ! . . . #55 @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on


मिलिंद सोमण ५५ वर्षांचा झाला असून त्याने  ‘हॅप्पी बर्थ डे टू मी…#55’ , अशी कॅप्शन या फोटोला दिली आहे.

दरम्यान,मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतच्या या जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये मिलिंदला अनेकवेळा वादविवादालाही सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे काही वेळा तो ट्रोलदेखील होत असल्याचं दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 11:31 am

Web Title: happy birthday milind soman shared nude photo ssj 93
Next Stories
1 बिग बींनी जोडले स्पर्धकासमोर हात; कारण वाचून व्हाल हैराण
2 जाणून घ्या,बिग बॉसच्या घरात येणारा अली गोणी आहे तरी कोण?
3 Birthday Special : ‘या’ अभिनेत्यासोबत तब्बू होती दहा वर्षे रिलेशनशीपमध्ये
Just Now!
X