‘अंकुर’ या चित्रपटातून १९७४ साली चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचा आज वाढदिवस. शबाना यांनी गेली अनेक वर्ष बॉलिवूड आणि रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. शबाना यांनी आतापर्यंत १२० हून अधिक हिंदी आणि बंगाली चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. यात व्यावसायिक तसेच समांतर चित्रपटांचा समावेश आहे.

कवी आणि पटकथाकार जावेद अख्तर यांची पत्नी असलेल्या शबाना या केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर त्यांचा अन्य क्षेत्रांमध्येही सक्रिय सहभाग असल्याचं पाहायला मिळतं. अभिनय करण्याबरोबर सामाजिक आणि स्त्रियांच्या अधिकाराच्या चळवळीतदेखील त्या सक्रिय असतात. या व्यतिरिक्त त्यांना डॉक्टरेट ही पदवीदेखील मिळाली आहे.

मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Draupadi murmu
भाजपाकडून पुन्हा राष्ट्रपतींचा अवमान? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल; विरोधकांच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर!
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

जागतिक मनोरंजनसृष्टीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल टेरी(TERI) विद्यापीठातर्फे शबाना आझमी यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली असून यापूर्वी त्यांना जादवपूर विद्यापीठ, लीडस मेट्रोपोलिटिअन विद्यापीठ, जामीया मिलिया विद्यापीठ आणि सायमन फ्रेझर विद्यापीठाकडून डॉक्टरेटची पदवी मिळाली होती. तसेच त्यांना पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीला पाऊल ठेवणाऱ्या शबाना यांनी राष्ट्रीय चित्रपटांप्रमाणेच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून भूमिका वठविल्या आहेत. ‘जुनून’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘कंधार’, ‘स्पर्श’, ‘पार’, ‘सती’, ‘अर्थ’ आणि ‘गॉडमदर’ इत्यादी एका पेक्षा एक सरस अशा चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. जॉन श्लेसिंगर यांचा ‘मॅडम सोऊसाटस्का’ आणि रोनाल्ड जॉफ यांचा ‘सिटी ऑफ जॉय’ या हॉलिवूड चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे.