News Flash

#MazyaNavryachiBayko : राधिकाने विकत घेतली ३०० कोटींची कंपनी; सोशल मीडियावर भन्नाट विनोद व्हायरल

नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक होत चाललेली ही मालिका सोशल मीडियावरही जोरदार चर्चेत असते.

राधिकाने विकत घेतली ३०० कोटींची कंपनी; सोशल मीडियावर भन्नाट विनोद व्हायरल

‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘स्वावलंबी’ राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला ‘बिचारा’ गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. नवनवीन ट्विस्ट आणि टर्न्स यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक होत चाललेली ही मालिका सोशल मीडियावरही जोरदार चर्चेत असते.

सध्या या मालिकेने रंजक वळण घेतलं आहे. सुरुवातीला गृहिणी, साधी भोळी असणारी राधिका सुभेदार आता एका मोठ्या कंपनीची मालकीण झाली आहे. इतकंच नाही तर गुरुनाथ सुभेदार ज्या कंपनीचा सीईओ होता, ती कंपनीही राधिकाने विकत घेतली आहे आणि यावरूनच सोशल मीडियावर भन्नाट जोक्स आणि मीम्स व्हायरल होत आहेत. ‘राधिका मसाले’चा सर्वत्र बोलबाला आहे. राधिकाने ३०० कोटी रुपयांत एक कंपनी विकत घेतल्यावरून अनेक विनोद सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Next Stories
1 Video :रणवीरने शेअर केली ‘सिम्बा’च्या पडद्यामागील दृश्य
2 बिग बींच्या नातीचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत का ?
3 एकेदिवशी निशाला लातूरला घेऊन जाणारच, सनीच्या पतीनं व्यक्त केली इच्छा
Just Now!
X