28 May 2020

News Flash

वेब सीरिज पाहा फुकट; अ‍ॅमेझॉन प्राईमनंतर HBO देणार फ्री सबस्क्रिप्शन

लोकप्रिय वेब शो पाहा फुकट

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. परिणामी लोक आपल्या घरातच कैद झाले आहेत. घरात थांबून वैतागलेली लोकं वेळ घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. या प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ अ‍ॅपने आपली सेवा काही काळासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार हा नवा प्रयोग एचबीओने सध्या तरी प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे. त्यामुळे प्रेक्षक ५०० मिनिटांपर्यंत या अ‍ॅपचा मोफत आनंद घेऊ शकतात. या नव्या योजनेमुळे ‘द सोप्रानोस’, ‘सिक्स फीट अंडर’, ‘द वायर’, ‘बॅरी’, ‘ट्रू ब्लड’, ‘सिलीकॉन वॅली’ यांसारखे अनेक लोकप्रिय शो फ्रीमध्ये पाहाता येतील.

एचबीओ हे एक ऑनलाईन अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर आपण नेटफ्लिक्स किंवा अ‍ॅमेझॉन प्राईमप्रमाणेच वेब सीरिज किंवा चित्रपट पाहू शकतो. या अ‍ॅपचा आनंद घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला काही ठरावीक रिचार्ज करावा लागतो. मात्र लॉकडाउनच्या काळात या अ‍ॅपचा वापर मोफत करता येईल. यापूर्वी अशीच काहीशी सेवा ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ व ‘झी ५’ या अ‍ॅप्सने देखील सुरु केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 7:23 pm

Web Title: hbo free programming available due to stay home mppg 94
Next Stories
1 ‘या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत’ शाहरुखने केले मराठीमध्ये ट्विट
2 तापसी पन्नूने मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाची उडवली खिल्ली, सोशल मीडियावर झाली ट्रोल
3 करोनाच्या विळख्यातून कसे रहाल सुरक्षित? पाहा हिनाने दिल्या खास टिप्स
Just Now!
X