आजकाल बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आयटम साँग करताना दिसतात. पण बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता की एकच अभिनेत्री आयटम साँगसाठी ओळखल्या जायच्या आणि त्या अभिनेत्री म्हणजे हेलन. हेलन यांनी त्यांच्या नृत्याच्या स्टाईलने अनेकांच्या मनावर जादू केली होती. आज २१ नोव्हेंबर रोजी हेलन यांचा ८१ वा वाढदिवस. हेलन यांचा जन्म रंगून येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जॉर्ज डेसमायर होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेलन यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांत कम केल. त्यातील ‘डॉन’ चित्रपटातील ‘ये मेरा दिल प्यार का दीवाना’ हे गाणे विशेष गाजले. आजही त्या गाण्यामधील हेलन यांचा डान्स अनेकांच्या लक्षात आहे. हेलन यांचा जन्म म्यनमार येथे झाला. काही काळानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब भारतात स्थायिक झाले. याचा खुलासा हेलन यांनी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी हेलन यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी म्यनमार येथून भारतात येण्याचे ठरवले. त्यावेळी हेलन या ३ वर्षांच्या होत्या. म्यनमारहून भारतात येण्यासाठी त्यांना तब्बल नऊ महिने प्रवास करावा लागल्याचे हेलन यांनी शोमध्ये सांगितले. दरम्यान त्यांना त्यांच्या भावाला देखील गमवावे लागले होते. भारतात आल्या नंतरही त्यांच्या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.

हेलन यांचे कुटुंब सर्वात पहिले आसाम येथे पोहोचले. त्यानंतर त्या कोलकाता येथे राहू लागल्या. कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी त्यांना शाळा सोडावी लागली होती. हेलन यांच्या आई पेशाने नर्स होत्या आणि त्यांच्या कमाईमध्ये घर चालवणे फार कठिण झाले होते. म्हणून हेलन यांनी आईला घर चालवण्यास हातभार लावण्यासाठी भरतनाट्यमचे धडे घेऊन बॅकग्राऊंट डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी ओळख निर्माण केली. वयाच्या १९व्या वर्षी ‘हावडा ब्रिज’ या चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक मिळाला.

हेलन यांनी १९५७ साली चित्रपट दिग्दर्शक पीएन अरोरा यांच्याशी लग्न केले होते. पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. सतत होणाऱ्या भांडणामुळे त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर १९६३ साली एका चित्रपटाच्या सेटवर हेलन यांची ओळख सलीम खान यांच्याशी झाली. दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे म्हटले जाते. १९८१ साली हेलन आणि सलीम यांनी लग्न केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helan birthday special story nine month long journey to reach india avb
First published on: 21-11-2019 at 08:52 IST