बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी आजी-आजोबा झाले आहेत. त्यांची धाकटी मुलगी अहाना देओलने मुलाला जन्म दिला आहे. हेमा मालिनी यांनी ट्विटद्वारे आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली.
त्यांनी ट्विट केले की, ‘आपल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार. हो, अहानाने एका मुलाला जन्म दिलाय आणि आम्ही सगळे खूश आहोत. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.’ अहानाने गेल्यावर्षी २ फेब्रुवारी २०१४ रोजी दिल्लीतील व्यावसायिक वैभव वोरा याच्याशी विवाह केला होता.