16 December 2017

News Flash

नवज्योत सिंग सिद्धू यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

सिद्धू यांच्याविरोधातील याचिका फेटाळली

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 11, 2017 3:55 PM

कपिल शर्मा, नवज्योतसिंग सिद्धू

माजी क्रिकेटर आणि पंजाबचे पर्यटनमंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमधील त्यांच्या सहभागावर रोख लावणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ही याचिकाच आधारहिन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

अॅड. हरिचंद अरोरा यांनी सिद्धूंविरोधात याचिका दाखल केली होता. सिद्धू हे पंजाबचे पर्यटनमंत्री आहेत आणि मंत्री असताना ते कॉमेडी शो किंवा कोणत्या जाहिरातीमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत. सिद्धू यांनी कपिलच्या शोमधून बाहेर पडावे किंवा मंत्रीपद सोडावे अशी मागणी याचिकेद्वारे केली होती.

वाचा : बिग बींच्या वाढदिवशी रोहित शेट्टीने केली ‘ही’ मोठी घोषणा

सप्टेंबरमध्येच ‘द कपिल शर्मा शो’ बंद झाला होता आणि आता शो बंद झाल्यानंतर याचिकेला काही अर्थ राहत नाही असे म्हणत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ती फेटाळली.

#TKSS

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

First Published on October 11, 2017 3:55 pm

Web Title: high court dismisses pil challenging navjot singh sidhu participation in comedy show