रानू मंडल आणि हिमेश रेशमिया यांच्या नव्या ‘आशिकी में तेरी’ या गाण्याचं टिझर रिलिझ करण्यात आलं आहे. टिझर रिलिझ होताच या गाण्यानं यूट्यूबवर धुमाकुळ घातला आहे. सध्या युट्यूबवर हे गाणं एक नंबरला ट्रेंड करत आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये हिमेश रेशमिया पुन्हा एकदा आपल्या जुन्या कॅप घातलेल्या लूकमध्ये दिसत आहे. २४ तासांच्या कालावधीत या गाण्याला तब्बल लाखो हिट्सही मिळाले आहेत. रानू मंडल आणि हिमेश रेशमियाच्या जोडीनं पुन्हा एकदा धुमाकुळ घातला आहे.

रानू मंडल आणि हिमेश रेशमिया यांचं हे गाणं हॅपी ‘हार्ड अँड हिर’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात हिमेश रेशमियाचा नवा हटके अंदाज पहायला मिळत आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रानू मंडलनं या चित्रपटात तीन गाणी गायली आहेत.

रानू मंडल एका व्हिडीओद्वारे प्रकाशझोतात आल्या होत्या. एका प्रवाशानं कोलकात्यातील राणाघाट रेल्वे स्टेशनवर त्यांनी गायलेलं ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकलं होतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर तो व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर हिमेश रेशमियानं त्यांना एका चित्रपटासाठी गाण्याची ऑफर दिली होती. तेरी मेरी कहानी, आदत आणि आशिकी में तेरी ही तीन गाणी त्यांनी गायली आहेत.