27 February 2021

News Flash

एकताने तिचा पद्मश्री पुरस्कार परत द्यावा, त्या वादावरुन हिंदुस्तानी भाऊची मागणी

हिंदुस्तानी भाऊ आणि एकतामधील वाद अद्याप शांत झालेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून निर्माती एकता कपूरची ‘ट्रिपल एक्स’ ही वेब सीरिज चर्चेत आहे. या सीरिजमध्ये भारतीय जवानांचा अपमान करण्यात आला असल्याची टीका हिंदुस्तानी भाऊने केली. हिंदुस्तानी भाऊ आणि एकतामधील वाद अद्याप शांत झालेला नाही. आता हिंदुस्तानी भाऊने एकताने तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे.

हिंदुस्तानी भाऊने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने, ‘एकता कपूरने तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत करावा किंवा भारतीय जवानांची माफी मागावी. तुझ्यासारख्या लोकांची माझ्या भारताला गरज नाही. जय हिंद’ असे म्हटले आहे.

तसेच हिंदुस्तानी भाऊने ट्विटही केले आहे. या ट्विटमध्ये त्याने एकता कपूरला पद्मश्री पुरस्कार का देण्यात आला? तिने देशासाठी काय केले आहे? मी राष्ट्रपतींना विनंती करतो की त्यांनी एकता कपूरला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी एकताच्या ‘अल्ट बालाजी’ या अॅपवर ‘ट्रिपल एक्स’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. या सीरिजच्या दुसर्या पर्वात एका भारतीय जवानाची कथा दाखवण्यात आली आहे. यामध्ये सैनिक सिमेवर असताना त्याची पत्नी इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करताना दाखवण्यात आले आहे होते. त्यामुळे या सीरिजची कथा समाजात भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊने केला होता. त्याने या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एकताने सीरिजमधील तेवढा भाग काढून टाकला होता. तरीही तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. तिला अनेक धमक्याही येऊ लागल्या होत्या. तिने सोशल मीडियाद्वारे यावर स्पष्टीकरण दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 11:50 am

Web Title: hindustani bhau now wants ekta kapoor to return her padmashri award avb 95
Next Stories
1 संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता सोनू सूद म्हणतो…
2 Lovestory : …अन् महिन्याभरातच आनंदने सोनमला घातली लग्नाची मागणी
3 चेहऱ्यावरून ६७ काचांचे तुकडे काढले; महिमा चौधरीने सांगितल्या त्या भीषण अपघाताच्या आठवणी
Just Now!
X