आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. कोणाताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तीमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी आनंद कुमार संघर्ष करत राहिले. त्याचा हाच जीवनप्रवास ‘सुपर ३०’मधून उलगडण्यात आला आहे. हृतिक रोशन याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली आहे.

बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरलेला सुपरह ३० हा चित्रपट अखेर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये हृतिक रोशन मुख्य भूमिकेमध्ये असल्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता होती. त्यासोबतच आनंद कुमार यांचा जीवनप्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार असल्यामुळे प्रेक्षकांना एक वेगळच कुतूहल होतं. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट प्रेक्षकांना फार काही रुचलेला दिसत नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ ११.८३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.८३ कोटींची कमाई केली असून विकेंडच्या दिवशी या कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचं वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, ‘सुपर ३०’ या चित्रपटाची निर्मिती रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्सच्या अंतर्गत करण्यात आली आहे. तर चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल यांनी केलं आहे. हा चित्रपट आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित असून आनंद कुमार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.