16 January 2019

News Flash

हृतिकचं वडिलांशी पटत नसल्याने रखडतोय ‘क्रिश ४’

बापलेकामधील मतभेदांमुळे चित्रपटाचं शूटिंग लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

हृतिक रोशन, राकेश रोशन

वडील राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून अभिनेता हृतिक रोशनने पदार्पण केलं. हृतिकच्या पहिल्याच चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर प्रचंड यश मिळालं. बापलेकाच्या या जोडीने पुढे ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’ आणि ‘क्रिश ३’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला. पडद्यावर कमाल दाखवणाऱ्या या हिट जोडीमध्ये आता मात्र कमालीचे मतभेद निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. हा मतभेद आगामी ‘क्रिश ४’ या चित्रपटातून होत आहे. त्यामुळेच ‘क्रिश ४’चं शूटिंगही रखडल्याचं म्हटलं जात आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटात कोणत्या कलाकारांनी भूमिका साकारावी आणि कथेचा ओघ कसा असावा याबाबत हृतिकची काही मतं आहेत. ‘क्रिश ४’ प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरावा, त्यात आयती उत्तरं असून नयेत, असं त्याला वाटतंय. तर याबाबत राकेश रोशन यांची मतं वेगळी आहेत. या मतभेदांमुळेच शूटिंगचं काम सुरू व्हायला विलंब होत आहे.

View this post on Instagram

And the journey begins…#Super30

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

वाचा : अशी सुरू आहे सोनम कपूरच्या लग्नाची तयारी

सध्या हृतिक ‘सुपर ३०’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर ‘क्रिश ४’च्या शूटिंगला सुरुवात होईल. मात्र दोघांत एकमत होत नसल्यानं आता शूटिंग आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

First Published on April 16, 2018 6:18 pm

Web Title: hrithik roshan has creative differences with father rakesh roshan over krrish 4