21 October 2020

News Flash

World Health Day: जागतिक आरोग्य दिनानिमित्त चाहत्यांसाठी ऋताचा मोलाचा संदेश

'दुर्गा', 'फुलपाखरू' यांसारख्या मालिकांतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं जागतिक आरोग्य दिनानिमित्त चाहत्यांना खास संदेश दिला आहे.

ऋता दुर्गुळे

जगभरात ७ एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संमेलन झालं. आरोग्याची काळजी कशी घ्यावी, निरोगी राहण्यासाठी काय करावं, यांसारख्या अनेक विषयांवर या दिवशी प्रत्येकजण आपापले विचार मांडत असतो. यामध्ये सेलिब्रिटीसुद्धा मागे नाहीत. सोशल मीडियाद्वारे हे सेलिब्रिटी चाहत्यांना आरोग्याविषयी विविध सल्ले देत असतात. अभिनेत्री ऋता दुर्गुळेनंही जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने चाहत्यांना खास सल्ला दिला आहे.

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ऋताने चाहत्यांपर्यंत एक संदेश पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामध्ये तिने चाहत्यांकडून स्वत:च स्वत:ची काळजी घेण्याचं वचन मागितलं आहे. त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये यासाठी तिने काही उपाय सांगितले आहेत. जास्तीत जास्त पाणी पिऊन उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या, असा सल्ला ऋताने दिला आहे.

वाचा : सलमानला साथ देणं पाकिस्तानी अभिनेत्रीला पडलं महागात 

‘दुर्वा’ या मराठी मालिकेतून ऋता घराघरात पोहोचली. तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेली ऋता सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत तिनं चाहत्यांना जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोलाचा संदेश दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2018 1:00 pm

Web Title: hruta durgule on world health day giving special message to her fans
Next Stories
1 सलमानला साथ देणं पाकिस्तानी अभिनेत्रीला पडलं महागात
2 ‘त्या’ दोन अभिनेत्रींमुळे सलमानने केली काळवीटाची शिकार; प्रत्यक्षदर्शीचा दावा
3 Update – सलमान विशेष विमानाने जोधपूरहून मुंबईत दाखल
Just Now!
X