बॉलिवूड सेलिब्रिटीज दररोज शेकडो फोटोग्राफर्सला सामोरे जात असतात. या सेलिब्रिटीजची लोकप्रियता आणि फॅन फॉलोईंग पाहता त्यांची एक झलक आपल्या कॅमेरात टीपण्यासाठी फोटोग्राफर्स तासन् तास त्यांची वाट पाहत त्यांच्या घराबाहेर, सेटबाहेर, विमानतळावर उभे असतात. यापैकी अनेक फोटग्राफर्सचे चेहरे तर सेलिब्रिटीजच्या ओळखीचे झालेले असतात. त्यामुळे अनेकदा हे सेलिब्रिटीजही या फोटोग्राफर्सला ओळख दाखवतात. इतकच नाही तर त्यांची मस्करीही करताना दिसतात. असंच काहीसं झालं करीनाबरोबर.

करीना एका शुटींगनंतर घरी जाण्यासाठी निघाली होती. करीना आपल्या गाडीकडे चालू लागली. मात्र अचानक तिथे असलेल्या फोटोग्राफर्सने तिला फोटोसाठी पोझ देण्याची विनंती केली. यावेळी करीनाने आधी पोझ दिली मात्र नंतर स्वत: पायजम्यामध्ये असल्याचे तीच्या लक्षात आल्यानंतर ती हसतच चालू लागली. काळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या पायजम्यामध्ये असणाऱ्या करीनाने काढता पाय घेतला तेव्हा फोटोग्राफर्सने तिला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती, “अरे मी पायजम्यात आहे,” असं म्हणत आपल्या गाडीच्या दिशेने चालू लागली.

 

View this post on Instagram

 

#kareenakapoorkhan snapped at post shoot in Mumbai today #viralbhayani @viralbhayani

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap) on

तैमुरच्या वाढदिवसाच्या दिवशी फोटोग्राफर्सला केक

डिसेंबर महिन्यामध्येतैमुरच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेल्या फोटोग्राफर्सच्या खाण्यापिण्याची काळजी घेण्याची सूचना करताना सैफ आणि करीना दिसले होते. झालं असं की वाढदिवसाचा केक कापून झाल्यानंतर फोटोसाठी करीना आणि सैफ बाहेर आहे. सैफने ग्रे रंगाचा टी-शर्ट आणि करीनाने पोलका डॉट प्रिंट असणारा ड्रेस परिधान केला होता. या दोघांनाही बराच वेळ फोटोग्राफर्सला त्यांचे फोटो काढू दिले. त्यानंतर तेथून निघताना सैफने या फोटोग्राफर्सला केक दिला. तर करीनाने त्यांना स्नॅक फूड्सची पाकिटं द्या असं तेथील कर्मचाऱ्यांना सांगितलं. सैफने दिलेला केक कापण्यासाठी फोटोग्राफर्सला सुरी देण्यासही करीनाने सांगितलं. त्यानंतर फोटोग्राफर्ससाठी खाण्याचे बॉक्स आणण्यात आले तेव्हा सैफने स्वत: अनेक फोटोग्राफर्सला हे बॉक्स वाटले. करीनानेही त्याला मदत केली. कोणीही खाल्ल्याशिवाय जाऊ नये संदर्भात दोघेही आयोजकांकडे चौकशी करुन तशा सुचना करत होते. यावेळी तेथील काही फोटोग्राफर्सने करीना आणि सैफला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत धन्यवादही म्हटलं होतं. हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चांगलाच चर्चेत आला होता.