बॉलिवूड आणि क्रिकेट कनेक्शन काही नवं नाही, तर काही दिवसांपूर्वी बॉलिवूड स्टार निधी अग्रवाल आणि क्रिकेट संघाचा फलंदाज लोकेश राहुल यांच्या रिलेशनशिपची चर्चा होती. या दोघांनाही एकत्र पाहिलं गेलं होतं, त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय असा प्रश्न अनेकांना पडला होता.

एका टीव्ही शोमध्ये लोकशला निधीसोबतच्या रिलेशनशीपबद्दल विचारलं होतं. निधीला मी कॉलेजमध्ये असल्यापासून ओळखत आहे, आम्ही खूपच चांगले मित्र आहोत. त्यामुळे आमच्याबद्दल ज्या चर्चा होत आहेत त्या निव्वळ अफवा आहेत असं लोकेशनं मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
“एक मुलगा आणि मुलगी चांगले मित्र असणं ही गोष्ट पचवणं इतकं कठीण आहे का? आम्ही दोघंही एकाच शहरात राहतो, त्यामुळे भेटणं होतंच. ज्यावेळी मी कोणत्याही मुलीसोबत डेट करत असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. माझ्या गर्लफ्रेंडला मी राणीसारखं वागवीन, कोणतीही गोष्ट लपवून ठेवणार नाही.” असंही लोकेश म्हणाला होता.

त्यामुळे लोकशनं एकंदरच या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तीन आठवड्यापूर्वी लोकेश आणि निधी एकत्र डिनर डेटसाठी गेले होते. तेव्हापासून या दोघांच्या नात्याबद्दल बॉलिवूड आणि क्रिकेटविश्वात चर्चा सुरू आहेत.