तिच्याकडे ‘अभिनयगुण’ अपरंपार आहेत. म्हणजे अभिनय कशाशी खातात हेसुद्धा माहीत नसताना अभिनेत्री म्हणून हिंदी सिनेमात पदार्पण करणे हे काही सहजसाध्य नव्हे. परंतु आपल्याकडे काय असायला हवे या पेक्षा काय आहे याची जाणीव असणे हीसुद्धा मोठी गोष्ट आहे. त्या दृष्टीने पूनम पांडेला १०० गुण द्यायला हवेत. आपण अभिनय करू शकत नाही, हे या मुलुंडच्या मुलीला चांगलेच ठाऊक आहे. त्याचबरोबर आपले झाकलेले शरीर लोकांना आकर्षित करू शकणार नाही याचीही तिला जाणीव आहे. मग तेच शरीर उघडे करून दाखवण्याचा पर्याय तिच्यासमोर उरला. आणि तो मात्र यशस्वी ठरला. ट्विटरवरील तिच्या फॉलोअर्सची संख्या ४ लाखांवर गेली आहे यावरून तिची ‘लोकप्रियता’ ध्यानी यावी. तर अशी ही पूनम आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे.
मॉडेल म्हणून कारकीर्दीला सुरुवात करतानाच शरीरप्रदर्शनाद्वारे जवळपास २७-२८ कॅलेण्डर्समधून लोकप्रियता मिळविण्याबरोबरच कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आयपीएलचा अंतिम विजेता ठरल्यानंतर ‘नग्न’ होऊन तिने संस्कृतीरक्षकांना झिणझिण्या आणल्या होत्या. अभिनयासाठी आपली गणना कोणी करेल याची वाट पाहण्यापेक्षा सवंगपणे लोकांच्या चर्चेचा विषय बनणे हे पूनम पांडेला अधिक आवडते. मॉडेलिंग क्षेत्रात काही काळ काम केल्यानंतर मुख्यत्वे कॅलेण्डर गर्ल म्हणूनच ती गाजली. ‘नशा’ या चित्रपटाद्वारे पूनम येत्या शुक्रवारपासून बॉलिवूडमध्ये प्रवेश करीत असून तिच्या ‘प्रतिमे’ला साजेसाच चित्रपट ती करतेय.
‘नशा’च्या पोस्टरमुळे राजकीय वाद रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात असून शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत तरी सगळ्यांना आपले नाव ठाऊक व्हावे म्हणूनच बहुधा पूनमने चित्रपट केला असावा. कारण यापूर्वी आपण तब्बल ४० चित्रपट नाकारले असल्याचे तिने म्हटलेय. तारुण्यात पदार्पण करणारा, मिसरूडही न फुटलेला मुलगा २५-२६ वर्षांच्या स्त्रीच्या प्रेमात पडतो असे कथानक असलेला हा चित्रपट खूपच ‘इंटरेस्टिंग’ वाटला म्हणून स्वीकारला असे पूनम म्हणते. स्त्री-पुरुषाच्या लैंगिक-शृंगारिक संबंधांचे अतिशय तरल आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने चित्रण असलेला हा चित्रपट असल्याचाही तिचा दावा आहे. आत बोला..
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2013 रोजी प्रकाशित
अभिनयाची नशा
तिच्याकडे ‘अभिनयगुण’ अपरंपार आहेत. म्हणजे अभिनय कशाशी खातात हेसुद्धा माहीत नसताना अभिनेत्री म्हणून हिंदी सिनेमात पदार्पण..

First published on: 24-07-2013 at 07:39 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Insobriety of acting