News Flash

मिकाला मिळाला ‘क्वारंटाइन लव्ह’; अभिनेत्रीला करतोय डेट?

सोशल मीडियावर मिका-चाहतच्या 'क्वारंटाइन लव्ह'ची चर्चा

मिका सिंग, चाहत खन्ना

एकीकडे सेलिब्रिटींच्या ‘क्वारंटाइन टाइम’ची चर्चा सुरू असताना दुसरीकडे गायक मिक सिंगच्या ‘क्वारंटाइन लव्ह’ची चर्चा सुरू झाली आहे. मिका अभिनेत्री चाहत खन्नाला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. चाहतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मिकासोबतचे फोटो पोस्ट केले असून कॅप्शनमध्ये ‘क्वारंटाइन लव्ह’ असं लिहिलं आहे.

या दोघांचे फोटो पाहून मिका व चाहत एकमेकांच्या प्रेमात पडलेत की काय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. तर दुसरीकडे हे दोघं पब्लिसिटीसाठी करतायत असंही म्हटलं जात आहे. या दोघांचा ‘क्वारंटाइन लव्ह’ या नावाने अल्बम येत असल्याने त्यांनी असे फोटो टाकले असावेत, असा अंदाज एकाने व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : ‘शेवटची फुल पँट कधी घातली होती आठवतच नाहीये’; प्रसाद ओकची भन्नाट पोस्ट

मिका व चाहत एकाच सोसायटीत राहतात. त्यामुळे लॉकडाउनदरम्यान या दोघांमध्ये जवळीक वाढली असावी, असेही कमेंट या फोटोवर येत आहेत. आता हे ‘क्वारंटाइन लव्ह’ नेमकं काय प्रकरण आहे हे मात्र मिका व चाहतच सांगू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2020 1:11 pm

Web Title: is mika singh dating actress chahatt khanna see pics ssv 92
Next Stories
1 ‘रणवीरला झालाय ‘हा’ आजार; दीपिकाने केला खुलासा
2 ‘२१ दुणे ४२’मध्ये आज आस्ताद काळे-स्वप्नाली पाटील व अंजली कोरान्ने करणार कथांचं अभिवाचन
3 नेहा धुपिया ‘पाच बॉयफ्रेंडच्या’ मुद्यावर ठाम; म्हणाली…
Just Now!
X