News Flash

नात्याला दोन वर्ष पूर्ण, ईशा केसकरने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो

सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील सध्याची शनाया उर्फ ईशा केसकर सध्या चर्चेत आहे. ईशा नेहमी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधत असते आणि तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे सांगत असते. ईशाने नुकताच सोशल मीडियावर बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला असून हा फोटो व्हायरल झाला आहे.

ईशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉयफ्रेंड अभिनेता रिशी सक्सेनासोबतचा फोटो शेअर केला आहे. तिने दोघांचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्याला आज दोन वर्षे पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. ईशाच्या या फोटोवर अनेक कलाकरांनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या फोटोमध्ये रिशी आणि ईशाची कमेस्ट्री पाहण्यासारखी आहे.

सध्या ईशा ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत शनायाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच उपेंद्र सिधये यांच्या ‘गर्लफेंड’ या चित्रपटात अमेय वाघ आणि सई ताम्हणकर सह ईशा केसकर पाहायला मिळते. ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उपेंद्र सिंधये यांच्यावर होती. उपेंद्र यांनीच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवालाने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 11:46 am

Web Title: isha keskar celebrating two years of their relationship by sharing photo with boyfriend avb 95
Next Stories
1 आमदाराने केला दीपिका-रणबीरवर ड्रग्स सेवन केल्याचा आरोप, मिलिंद देवरांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण
2 हा त्रिवेदी कोण आहे? विचारत आमिरने केला सैफला मेसेज
3 Video : ‘उन्नाव सामूहिक बलात्काराची कथा एखाद्या बॉलिवूडपटासारखी’, पायल रोहतगी पुन्हा बरळली
Just Now!
X