News Flash

अभिनेत्रीने केली करोनावर यशस्वी मात

डिस्चार्ज मिळाल्याचा फोटो करत अभिनेत्रीने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

श्रेणू पारिख

‘इश्कबाज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेणू पारिख हिने करोनावर यशस्वी मात केली आहे. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून पुढील काही दिवस ती घरीच क्वारंटाइनमध्ये राहणार आहे. डिस्चार्ज मिळाल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत श्रेणूने चाहत्यांचे आभार मानले आहेत. याचसोबत श्रेणूच्या तब्येतीची पूर्णपणे काळजी घेणाऱ्या डॉक्टर व नर्सेसचेही तिने आभार मानले.

‘माझ्यावर इतक्या प्रेमाचा व प्रार्थनाचा वर्षाव करणाऱ्या चाहत्यांचे मी कसे आभार मानू मला समजत नाहीये. देवाच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेने मी बरी होत असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आता मी माझ्या घरी संपूर्ण विलगीकरणात राहणार आहे. रुग्णालयातील करोना योद्धांची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची मी खूप आभारी आहे’, असं तिने लिहिलं.

आणखी वाचा : सुशांतच्या आठवणीत बहिणीने पोस्ट केला भावनिक व्हिडीओ

श्रेणू छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘भ्रम…सर्वगुण संपन्न’ या मालिकेतून तिने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘इश्कबाज’, ‘इस प्यार को क्या नाम दू’, ‘दिल बोले ओबेरॉय’, ‘ब्याह हमारी बहु’ या मालिकांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 12:50 pm

Web Title: ishqbaaz fame shrenu parikh discharged from hospital after covid treatment ssv 92
Next Stories
1 बॉलिवूड दिग्दर्शक रजत मुखर्जी यांचे निधन
2 सुशांतच्या आठवणीत बहिणीने पोस्ट केला भावनिक व्हिडीओ
3 ‘बाहुबली’ला मिळाली बॉलिवूडची ‘देवसेना’!
Just Now!
X