03 June 2020

News Flash

‘ती’ गोड बातमी ऐकून हॅरी पॉटर म्हणतो, “माझं बालपण आज अधिकृतरित्या संपलं”

हॅरी पॉटरने दिलं आश्चर्यचकित करणारं उत्तर

हॅरी पॉटर फेम अभिनेता डॅनियल रॅडक्लिफ लवकरच काका होणार आहे. त्याचा अत्यंत जवळचा मित्र रुपर्ट ग्रिंटला बाळ होणार असल्यामुळे डॅनियल प्रचंड खुश आहे. परंतु चकित करणारी बाब म्हणजे रुपर्ट बाबा होणार ही बातमी ऐकून डॅनियल प्रचंड दचकला होता. आपलं बालपण अधिकृतरित्या आता संपलंय याची जाणीव त्याला या बातमीमुळे झाली.

अवश्य पाहा – मनोरंजनसृष्टीने सोडला सुटकेचा निश्वास; मुख्यमंत्र्यांनी मागण्यांसंदर्भात केल्या सूचना

अँडी कोहेनला दिलेल्या मुलाखतीत डॅनियलने हा आश्चर्यचकित करणारा खुलासा केला. “हो मला रुपर्टने ही आनंदाची बातमी सांगितली. रुपर्ट आता बाबा होणार हे ऐकून मी खुपच खुश झालो होतो. पण तेवढ्यात माझं बालपण अधिकृतरित्या संपलं याची जाणीवही मला झाली. मी आजवर हॅरी पॉटरच्याच जगातच होतो. या बातमीने मला त्या जगातून बाहेर आणलं. मी खरंच मोठा झालो आहे या जणीवेवर मला विश्वास होत नाही आहे.” अशा आशयाचे वक्तव्य डॅनियलने या मुलाखतीत केले आहे.

अवश्य पाहा – Video: फोनवर बोलण्यात गुंग असणाऱ्या गायकाच्या हातात गर्लफ्रेंडने ठेवला साप

हॅरी पॉटर आणि रॉन विझली ही जोडी चाहत्यांसाठी नवी नाही. डॅनियल रॅडक्लिफ आणि रुपर्ट ग्रिंट हे लहानपणापासून खुप चांगले मित्र आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हॅरी पॉटर या एकाच चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. रुपर्ट ग्रिंटने साकारलेली रॉन विझली ही व्यक्तिरेखा हॅरी पॉटर इतकीच लोकप्रिय झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 4:45 pm

Web Title: its super weird were old enough to have kids harry potter mppg 94
Next Stories
1 जाणून घ्या कोण आहे ‘चाकू’
2 ‘पाताल लोक’ च्या यशावर जगजीत संधू म्हणतो…
3 गरोदर महिलेची प्रसुती ही इमर्जन्सी नसते का? ट्विट करत अभिनेत्याने मागितली मुंबई पोलिसांची मदत
Just Now!
X