अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांपासून जॅकलीनचे व्हिडीओ, फोटो हे चांगलेच चर्चेत येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच अलिकडे तिने गेंदा फूल या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील तिच्या डान्ससोबतच तिच्या लूकचीदेखील सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
जॅकलीनचं ‘गेंदा फूल’ हे गाणं तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय असून जॅकलीनने पुन्हा एकदा याच गाण्यावर ताल धरला आहे. या नव्या व्हिडीओमध्ये जॅकलीनने निळ्या रंगाची साडी नेसल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे तिची साडी आणि लूक खास चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ डान्सिंग फिव्हर या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, या गाण्यावर जॅकलीनसोबत अन्य डान्सर्स आणि नृत्यदिग्दर्शकदेखील दिसून येत आहे. या गाण्याला जवळपास ४१ हजार व्ह्युज मिळाले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 28, 2020 2:03 pm