बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर बऱ्याच वेळा विविध कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी तिच्या जीमच्या कपड्यांवरुन तर कधी चित्रपटातील लूकवरुन. या चर्चांमध्ये सध्या जान्हवीची नवीन चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे. जान्हवीला बाळ हवं असल्याचं तिने एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे तिच्या या कमेंटची सध्या चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसून येत आहे.
अलिकडेच जान्हवीने तिचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. विशेष म्हणजे या फोटोपेक्षा तिने दिलेलं कॅप्शन अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. जान्हवीने दिलेलं कॅप्शन पाहून अनेकांनी त्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. यातच चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची लेक आणि जान्हवीची जवळची मैत्रीण तनीषा संतोषीने त्यावर भन्नाट कमेंट केली आहे.
‘तुला खरंच मुलं हवेत आहेत का’? असा प्रश्न तनिषाने जान्हवीला विचारला. त्यावर जान्हवीने तात्काळ या कमेंटवर उत्तर देत, ‘हो मला बाळ हवं आहे’ असं सांगितलं. विशेष म्हणजे जान्हवीचं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जात आहे.
दरम्यान, जान्हवीने ‘धडक’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर लवकरच ती गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. इतकंच नाही तर या चित्रपटांव्यतिरिक्त ती ‘दोस्ताना 2’ आणि ‘तख्त’मध्येही झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2020 2:49 pm