24 October 2020

News Flash

नव्या चित्रपटाची घोषणा करत कंगनाने जया बच्चन यांच्यावर साधला निशाणा, म्हणाली…

"मी बॉलिवूडला पहिली अॅक्शन हिरोईन दिली"; कंगनाचा अजब दावा

बॉलिवूडची क्विन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोक मतं मांडते. अनेकदा या बिनधास्त प्रतिक्रियांमुळे तिला ट्रोल देखील केलं जातं. यावेळी ती आपल्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. कंगना लवकरच ‘धाकड’ आणि ‘तेजस’ हे दोन नवे अॅक्शनपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने या चित्रपटांची घोषणा केली. लक्षवेधी बाब म्हणजे चित्रपटांची घोषणा करताना तिने जया बच्चन यांना उपरोधिक टोला लगावला.

अवश्य पाहा – अक्षयच्या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’? ट्रोलर्सने केली ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी

“तेसज आणि धाकड या दोन आगामी चित्रपटांसाठी मी ट्रेनिंग सुरु केलं आहे. या चित्रपटांत मी सैनिक आणि एका डिटेक्टिव्हची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी बॉलिवूडच्या थाळीने मला खूप काही दिलं असेल पण मणिकर्णिकाचं यश माझं स्वत:च आहे. या चित्रपटातून मी बॉलिवूडला नवी अॅक्शन हिरोईन दिली.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगना अप्रत्यक्षरित्या जया बच्चन यांच्यावर टीका केली आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – निया शर्माची आजीबाईंसोबत ‘झिंगाट फुगडी’; व्हिडीओ होतोय व्हायरल…

यापूर्वी काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

राज्यसभेत जया बच्चन म्हणाल्या, “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. ज्या थाळीत खातात त्याच थाळीत भोकं पाडतात. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 1:35 pm

Web Title: jaya bachchan kangana ranaut tejas dhakad mppg 94
Next Stories
1 अक्षयच्या चित्रपटात ‘लव्ह जिहाद’? ट्रोलर्सने केली ‘लक्ष्मी बॉम्ब’वर बंदी घालण्याची मागणी
2 निया शर्माची आजीबाईंसोबत ‘झिंगाट फुगडी’; व्हिडीओ होतोय व्हायरल…
3 “मला लिंबू पाणी दिलं तरच…”; सोनू सूदची अजब अट
Just Now!
X