07 March 2021

News Flash

जिया खान मृत्युप्रकरणी सीबीआयकडून आदित्य पांचोलीच्या घराची झडती

बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्युप्रकरणी बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आदित्य पांचोलीच्या निवासस्थानाची झडती घेतली.

| May 14, 2015 11:06 am

बॉलीवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्युप्रकरणी बुधवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आदित्य पांचोलीच्या निवासस्थानाची झडती घेतली. यावेळी आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली याच्या खोलीचीही झडती घेण्यात आली. जिया खानने ३ जून २०१३ रोजी तिच्या निवासस्थानी फास लावून आत्महत्या केली होती. मात्र, या आत्महत्येला आदित्य पांचोलीचा मुलगा सुरज पांचोली जबाबदार असल्याचा आरोप जियाच्या आईने केला होता. जिया आणि सुरज यांचे प्रेमसंबंध होते आणि याच प्रेमसंबंधातील वादातून जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप जियाच्या आईने केला होता. जियाच्या आईने केलेल्या मागणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला होता. दरम्यान, काल सीबीआयच्या दोन पथकांनी पांचोली यांच्या निवासस्थानाची कसून तपासणी केली. मात्र, या तपासातील माहिती उघड करण्यास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. मध्यंतरी जियाच्या आईने आपल्या कुटुंबियांविषयी बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा आरोप करीत सूरजचे वडील अभिनेता आदित्य पांचोली याने तिच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2015 11:06 am

Web Title: jiah khan death cbi searches residence of aditya pancholi
Next Stories
1 बॉलीवूड मला अपशकुनी मानत होते -विद्या बालन
2 ‘बॉम्बे वेल्वेट’ साठीच्या दशकात घेऊन जाणारा- अनुराग कश्यप
3 पाहा: ‘एबीसीडी-२’ मधील श्रद्धा कपूरचा ड्रीम डान्स
Just Now!
X