02 March 2021

News Flash

सूरज पांचोलीवर घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा?

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोली याची रवानगी १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. सूरजने आपल्यावर बलात्कार करून मारहाण केल्याचा आरोप जिया खानने केला

| June 12, 2013 03:24 am

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी सूरज पांचोली याची रवानगी १३ जूनपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. सूरजने आपल्यावर बलात्कार करून मारहाण केल्याचा आरोप जिया खानने केला होता. जिया व सूरज ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहात असल्याने सूरजवर ‘घरगुती हिंसाचार प्रतिबंधक’ कायद्याखाली गुन्हा दाखल करता येईल का या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
जिया खानने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सूरजवर बलात्कार, मारहाण, धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सोमवारी जुहू पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सूरजला अटक केली होती. मंगळवारी त्याला अंधेरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सूरजवर पत्रात गंभीर आरोप केले असल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील ए. के. पाचरणे यांनी केली. तर सूरजचे वकील जमीर खान यांनी ते पत्र जियाने लिहिलेच नसल्याचा दावा केला. सूरजने प्रेमसंबंधांत जियाला कुठल्याही प्रकारचे आश्वासन दिले नव्हते, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. ते पत्र तीन दिवसांनी मिळाले याकडेही त्यांनी लक्ष वेधले. न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद अमान्य करत सूरजला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सूरजविरोधात भक्कम पुरावे
सूरजविरोधात पोलिसांनी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ज्या रुग्णालयात जियाने गर्भपात केला त्या रुग्णालयातही पोलीस तपास करत आहेत. जियाच्या चेहऱ्यावर मारहाणीचे काही व्रण आढळले होते. त्या संदर्भातील वैद्यकीय अहवालाची वाट पोलीस बघत आहेत. सूरजने मारहाण केली होती का हे त्यात स्पष्ट होऊ शकेल. आत्महत्येच्या दिवशी सूरजने आपल्या नोकराकरवी जियाला पुष्पगुच्छ पाठवला होता. त्या नोकराचा जबाबही पोलिसांनी नोंदवला आहे.

सूरज-जियाचे ‘लिव्ह इन रिलेशन’
दरम्यान, मंगळवारी पुन्हा पोलिसांनी जियाच्या आईची भेट घेतली. सूरजने जियाला लग्नाचे वचन दिले होते. तसेच ते दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये एकत्र रहात असल्याने सूरजवर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधात्मक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी राबिना यांनी केली. त्याबाबत विचार सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. राबिना यांनी सूरजचे वडिल आदित्य पांचोली यांनाही अटक करण्याची मागणी केली होती. पण आदित्य पांचोलीचा यात सहभाग असल्याचे आढळलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2013 3:24 am

Web Title: jiah khans boyfriend suraj pancholi arrested under prevention of domestic violence law
Next Stories
1 ‘बुलेट राजा’ साठी सैफ अली खान होणार सावळा
2 दबंगकार अभिनव रोमॅंटीक चित्रपटाची निर्मिती करणार
3 ‘ये जवानी है दीवानी’च्या टीव्हीवरील प्रदर्शनास बंदी
Just Now!
X