केरळमध्ये पावसाच्या थैमानामुळे आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या केरळमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय आपात्कालीन बचाव दलाच्या आणखी १२ टीमही येथे रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न सुरु असून अभिनेता जॉन अब्राहम यानेही येथील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली आहे. केंद्र सरकार केरळच्या जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे असून कुठल्याही मदतीसाठी तयार आहे ,असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. त्यानंतर जॉननेही लोकांना आवाहन करुन मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून या पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

‘केरळमध्ये सध्या जे काही सुरु आहे त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तेथील नागरिकांवर ओढावलेलं हे संकट पाहून मला प्रचंड त्रास होत आहे. केरळबरोबर माझ्या बालपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे माझी साऱ्यांना विनंती आहे की त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून या पूरग्रस्त नागरिकांची मदत करावी’, असं आवाहन जॉनने केलं आहे.

दरम्यान, केरळवर ओढावलेलं हे संकट पाहून सध्या सर्व स्तरामधून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे होत आहे. त्यामुळे जॉनने केलेल्या या आवाहनामुळे आता बॉलिवूड सेलिब्रेटीही केरळच्या मदतीसाठी धावल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे   १२ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: John abraham extremely disturbed by kerala floods
First published on: 16-08-2018 at 16:05 IST