|| रेश्मा राईकवार

एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडते, आपण या गोष्टीतून भारी काहीतरी करू शकू  असं आपल्याला वाटत राहतं. गोष्टीच्या प्रेमात असताना आपण आपल्याला त्यातलं नेमकं  काय आवडलं आहे, दुसऱ्याला सांगताना आपण यातलं काय सांगणार आहोत? याचा विचारच करत नाही. बस्स् फक्त आपल्याला आवडलेली गोष्ट आपण जशीच्या तशी दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करतो, पण ती आपण जशी अनुभवलीय तशीच दुसऱ्यापर्यंत पोहोचते असं नाही. अनेकदा त्या मूळ गोष्टीची मोडतोड झालेली असते, ढाचा तोच, गोष्टही तीच, त्यातली पात्रंही तीच… पण त्याचा आत्मा कु ठे गवसत नाही. अशीच काहीशी अवस्था नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट पाहताना होते.

‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या पॉला हॉकिन्स यांच्या कादंबरीवर आधारित असलेला हॉलीवूडपट त्याच नावाने २०१६ साली प्रदर्शित झाला होता. त्याचा हिंदी रिमेक करण्याचा घाट घालत लेखक -दिग्दर्शक रिभू दासगुप्ता यांनी तिथल्याच ट्रेनमध्ये चढणाऱ्या भारतीय मुलीची कथा रंगवली आहे. यातला भारतीय हा संदर्भ इथे मुद्दाम सांगायला हवा कारण वर म्हटलं तसं जशीच्या तशी गोष्ट सांगायची हा लेखकाचा मोह हिंदी आवृत्ती करताना हास्यास्पद ठरला आहे. मुळात हॉलीवूडपटात रंगवलेली ही गोष्ट हिंदीत आणताना त्यातल्या व्यक्तिरेखा, त्यांचे राहण्या-जगण्याचे संदर्भ या सगळ्या गोष्टी बदलता आल्या असत्या किं वा त्या तशा बदलणे अपेक्षित होते, मात्र इथे के वळ भारतीय कलाकारांचे चेहरेच तेवढे बदलण्यात आले आहेत. असो… तर आधी गोष्ट महत्त्वाची. रहस्यमय कथा आणि त्याला असलेला भावनिक पदर या दोन गोष्टींची उत्तम सांगड खरंतर मूळ कथेत घालण्यात आली आहे. या कथेच्या जोरावरच  चित्रपटाकडे आपण आकर्षित होतो. चित्रपटाच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये एक लग्नसोहळा आणि त्याअनुषंगाने एक गाणं पार पडतं. या गाण्यात नायक-नायिका भेटतात. गाणं संपतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की नायिका मीरा कपूर आहे, जी प्रथितयश वकील आहे आणि तिला जो तरुण लग्नात भेटला त्याचं नाव शेखर असून या दोघांचंही शुभमंगल झालं आहे. या जोडप्याला मूल होणार आहे आणि त्याचवेळी मीरा जो खटला लढवते आहे तो तिने लढवू नये म्हणून तिला धमक्या दिल्या जात आहेत. यावरून दोघांमध्ये असलेला बेबनाव, मीराचं खटला जिंकणं आणि त्यानंतर काही दिवसांत त्यांचा अपघात होणं, मीरानं मूल गमावणं, तिचं दारूच्या आहारी जाणं आणि शेखरने तिला सोडून दुसरीशी सूत जुळवणं… कोणालाही दम लागावा इतक्या वेगात या साऱ्या घटना आपल्यापर्यंत सुरुवातीच्या काही मिनिटांत पोहोचतात. मात्र गोष्ट ही नाहीच आहे… ती खूप उशिराने सुरू होते. दारूत कायम बुडालेली मीरा दररोज न चुकता एका स्टेशनवरून ट्रेन पकडते आणि दुसऱ्या स्टेशनला उतरते. या प्रवासादरम्यान तिला दोन घरं दिसतात. एक जे तिचं स्वत:चं घर आहे, जिथे शेखर दुसऱ्या पत्नीबरोबर राहतो आहे. आणि दुसऱ्या घरात तिला दिसते ती नुसरत. देखण्या चेहऱ्याची नुसरत आणि तिचा नवरा आनंद या दोघांचा सुखी संसार काही सेकं दापुरती मीरा रोज न्याहाळत असते. सुखी संसाराचं जे स्वप्न मीराने गमावलं आहे ते ती नुसरतच्या रूपाने काही सेकं दांसाठी रोज अनुभवत असते. एक दिवस ती नुसरतला अनोळखी व्यक्तीबरोबर जवळीक साधताना पाहते आणि तिच्या या आनंदाचा वणवा होतो. नुसरत स्वत:च्या हाताने आपला सुखी संसार विस्कटते आहे हे सहन न झालेली मीरा तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, पण या सगळ्या गोंधळात नुसरतच बेपत्ता होते. इथून सगळा पाठशिवणीचा खेळ वेगाने सुरू होतो.

मूळ कथा रहस्यमय आहे आणि तितकीच भावनिकही आहे. दोन स्त्री व्यक्तिरेखा… ज्यांचा प्रत्यक्षात काहीच संबंध नाही. एकीनं दुसरीला खूप दुरून फक्त न्याहाळत राहणं, तिच्या सुखाविषयीचा हेवा वाटून घेत तिच्यानिमित्ताने आपल्या आयुष्यात क्षणभराचा आनंद शोधणं, तिचं आयुष्य म्हणजे आपलं सुख मानणं आणि ते तिने उधळून टाकू  नये म्हणून तिच्यामागे धावत सुटणं. यातल्या काही स्त्रीसुलभ भावना आपण अनेकदा अनुभवलेल्या असतात. मात्र इथे मीराला स्वत:च्या आयुष्याचा सूर सापडत नाही आहे, दारूच्या नशेत आपण काय के लं आहे हे तिच्या लक्षात राहत नाही आणि तरीही नशेत असताना एक स्त्री आपलं आयुष्य विस्कटून टाकते आहे आणि तिला थांबवलं पाहिजे यावर ती ठाम आहे. मीरा आणि नुसरत या दोन व्यक्तिरेखांचं असं एकमेकांशी जोडलं जाणं हे या चित्रपटातलं महत्त्वाचं भावनिक नाट्य आहे. हा भाग चित्रपटातही उत्तम जमून आलेला आहे. पण या दोन व्यक्तिरेखा ज्यामुळे एकत्र येतात तो धागा चित्रपटात कथेचे संदर्भ बदलण्यात आल्याने अधिकच क मकु वत वाटतात. कथेला वळण देण्याच्या नादात विनाकारण नको त्या व्यक्तिरेखा आणि त्यांचा अतक्र्य भाग जोडला गेला असल्याने शेवटाकडे येता येता हा चित्रपट फसतो. आपले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करणारी, एकाच वेळी असहाय आणि खंबीर-हुशार अशी मीरा प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न अभिनेत्री परिणीती चोप्राने के ला आहे. नुसरतच्या भूमिके साठी आदिती राव हैदरीचे नितळ सौंदर्य, तिचा अंगभूत नाजूकपणा याचा छान वापर करून घेतला आहे. बाकी तिच्या वाटेला फारशी भूमिका आलेली नाही. के वळ भारतीय कलाकार असल्याने ते हिंदी संवाद बोलण्याचा प्रयत्न करतात. बाकी सगळी कथा परदेशातच घडते, त्यामुळे के वळ आपले कलाकार घेऊन मोडक्यातोडक्या हिंदी-इंग्रजीची सरमिसळ करत तीच गोष्ट सांगण्याचा अट्टहास नेमका कशासाठी? या प्रशद्ब्राचे उत्तर काही मिळत नाही.

द गर्ल ऑन द ट्रेन

दिग्दर्शन – रिभु दासगुप्ता

कलाकार – परिणीती चोप्रा, अविनाश तिवारी, आदिती राव हैदरी, कीर्ती कुल्हारी