01 March 2021

News Flash

इन्स्टाग्रामवर ‘कालीन भैय्या’चा दबदबा; फॉलोअर्सच्या संख्येत वाढ

पंकज त्रिपाठीच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ

‘मिर्झापूर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून आपला दबदबा निर्माण केलेला अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी. आजवर पंकज त्रिपाठीने केलेली प्रत्येक भूमिका गाजली आहे. पण, मिर्झापूरमधील कालीन भैय्या ही त्याची भूमिका प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली. या सीरिजनंतर पंकज त्रिपाठीच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. विशेष म्हणजे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून लाखोंच्या घरात त्याचा फॅनफॉलोअर्स तयार झाला आहे.

‘मिर्झापूर’ला एक वर्ष पूर्ण झाल्यावर पंकज त्रिपाठीने इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आणि पाहता पाहता त्याची लोकप्रियता कमालीची वाढली. आता या लोकप्रियतेने चक्क ३० लाखांचा टप्पा गाठला आहे. पंकज त्रिपाठी एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)


“कमी कालावधीत पंकज त्रिपाठी यांचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढले असून ३० लाख फॉलोअर्स झाले आहेत. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून माझ्याशी मैत्री केलीत त्यासाठी मनापासून धन्यवाद. या निमित्ताने आज एक पार्टी करुयात. ही पार्टी माझ्याकडूनच. प्रत्येकाने आपआपल्या घरातील स्वयंपाक घरात जा आणि एक ग्लास पाणी प्या. त्यानंतर ५ मिनिटांसाठी दीर्घ श्वास घ्या. माझ्याशी मैत्री केल्यामुळे, माझ्यावर प्रेम केल्यामुळे मनापासून धन्यवाद”, असं पंकज त्रिपाठी या व्हिडीओमध्ये म्हणाले.

दरम्यान, ‘मिर्झापूर’ व्यतिरिक्त पंकज त्रिपाठी ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’, लुडो, ‘शकिला’, ‘मिर्झापूर 2’, ‘क्रिमिनल जस्टिस : बिहाइंड डोर’ या सारख्या चित्रपट, वेब सीरिजमध्ये झळकले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 2:15 pm

Web Title: kaalin bhaiya aka pankaj tripathi made bhaukal on social media too 30 lakh followers on instagram ssj 93
Next Stories
1 ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; वाचा सविस्तर…
2 सरु आजीमुळे फुटणार डॉ. अजितचं बिंग; ‘त्या’ घटनेचा होणार खुलासा?
3 ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयानंतर करिश्माने विकलं घर
Just Now!
X