16 November 2019

News Flash

बॉक्स ऑफिसवर ‘कबीर सिंग’चं राज्य, दुसऱ्या दिवशी कमावला इतक्या कोटींचा गल्ला

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे

कबीर सिंग

तामिळ चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असलेला ‘कबीर सिंह’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २०.२१ कोटी रुपयांची कमाई केली असून शाहिदच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंती उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्याचं दिसून येत आहे.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर कबीर सिंगच्या कमाईची आकडेवारी शेअर केली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २२.७१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळेच या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये एकूणचं ४२.९२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या चित्रपटामधील शाहिद आणि कियाराची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत उतरल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच ७० कोटी रुपयांचा टप्पा गाठेल अशी शक्यता तरण आदर्श यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शनिवारी वर्ल्ड कप २०१९ मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामुळे कबीर सिंग चित्रपटावर त्याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र या सामन्यादरम्यानही प्रेक्षकांचा कल कबीर सिंगकडे वळल्याचं पाहायला मिळालं.

 

First Published on June 23, 2019 1:21 pm

Web Title: kabir singh movie box office collection day 2 shahid kapoor film ssj 93