News Flash

वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शवणारा ‘कानभट’

हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडमधील सिनेनिर्मात्या अपर्णा होशिंग ‘कानभट’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता भव्य शिंदे पाहायला मिळतोय. तो मंदिरासमोर उभा आहे आणि त्याच्यासमोर नदी वाहत आहे. तर अभिनेता ऋग्वेद एका पुजाऱ्याच्या भूमिकात दिसतोय. या चित्रपटाची कथा एका लहान मुलाची स्वप्नं आणि इच्छा यांभोवती फिरते.

या चित्रपटाच्या कथेत वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दाखवण्यात आलं आहे. पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली असून त्याचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शिका आणि निर्मात्या अपर्णा एस. होशिंग आपल्या चित्रपटाबद्दल सांगताना म्हणाल्या, “मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्याच चित्रपटाच्या पोस्टरला लोकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे मला खूपच आनंद आहे. मला माझ्या पहिल्या चित्रपटासाठी असाच विषय शोधायचा होता, जेथे आधुनिक आणि पारंपारिक मूल्ये एकमेकांशी जोडली जातील आणि कानभटची ही कथा स्वप्नांविषयी आणि वास्तवाविषयी भाष्य करते. ”

हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या दशकभरापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असणाऱ्या अपर्णा एस. होशिंग यांनी ‘जीना है तो ठोक डाल, ‘उटपटांग’ आणि ‘दशहरा’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 3:22 pm

Web Title: kanbhat marathi movie poster released ssv 92
Next Stories
1 नाट्यनिर्मिती अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांना मिळणार
2 नुसरत जहाँ आणि यश यांचा मंदिरातील व्हिडीओ व्हायरल, अफेअरच्या चर्चांना उधाण
3 ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला गेम, तुम्ही देऊ शकाल का उत्तर?
Just Now!
X