बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात काही बॉलिवूड कलाकारांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. दरम्यान त्यांच्या या कृतीवर अभिनेत्री कंगना रणौत हिने नाराजी व्यक्त केली. बॉलिवूडमधील लांडगे वृत्तमाध्यमांविरोधात एकत्र आले, अशी टीका तिने केली आहे.

अवश्य पाहा – ‘रामायणात १४ वर्षांचा वनवास होतो अन् करोनात…’; अभिनेत्रीने मानले BMC चे आभार

अवश्य पाहा – बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; पूजा भट्टने देशवासीयांना केली मदतीची विनंती

“बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र येऊन वृत्तमाध्यमांवर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. ज्यावेळी मजुरांवर, शेतकऱ्यांवर, स्त्रियांवर, गरीब जनतेवर अन्याय होतो त्यावेळी ही मंडळी कुठे असतात? हे लोक आज मानवाधिकाराच्या गप्पा मारतायेत पण इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा गप्प बसतात.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी अशाच प्रकारची टीका दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याने देखील केली होती.

“जेव्हा तुमच्या घरातील कुत्री-मांजरं, त्यांचे कपडे, मेकअप, हॉलिडेज, तुमची मुलं यांच्या पेड बातम्या जेव्हा छापल्या जात होत्या. तेव्हा तुम्हाला खुप चांगलं वाटत होतं. या बातम्या वाचणारे प्रेक्षक आणि चाहते जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारु लागले तेव्हा मात्र तुम्हाला त्रास होऊ लागला. थेट कोर्टाचाच दरवाजा तुम्ही ठोठावला.” अशा आशयाचं ट्विट करुन विवेक अग्निहोत्रीने आपली नाराजी व्यक्त केली होती.