News Flash

माझ्या इतकी प्रतिभावान अभिनेत्री संपूर्ण पृथ्वीवर शोधून दाखवा, सापडली तर…; कंगनाचं ट्विट

जाणून घ्या सविस्तर...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाने आपलं मत व्यक्त करत असते. सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा ती वादातही अडकली आहे. दरम्यान कंगनाने आता एक नवं वक्तव्य केलं असून संपूर्ण जगात आपल्यासारखी प्रतिभावान अभिनेत्री कोणीच नाही असं म्हटलं आहे.

कंगना ट्विट करत म्हणाली आहे की, “या संपूर्ण जगात माझ्यासारखी वेगवेगळी भूमिका साकारण्याची प्रतिभा कोणामध्ये असेल तर मी माझा अहंकार सोडून देईन. तोपर्यंत मी नक्कीच अहंकारात राहू शकते.” याआधी एक ट्विट करत कंगनाने आपली तुलना हॉलिवूड अभिनेत्री गॅल गॅडोटशी केली होती. त्या ट्विटवरून कंगना प्रचंड ट्रोल झाली होती.

कंगना लवकरच ‘थलाइवी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय तिचा ‘तेजस’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2021 7:33 pm

Web Title: kangana ranaut calls her self the best actress in the globe dcp 98
Next Stories
1 दिग्दर्शकाच्या सांगण्यावरुन प्रियांकाने केली प्लास्टिक सर्जरी? देसी गर्लने केला ‘त्या’ गोष्टीचा खुलासा
2 राजीव कपूर यांच्या निधनानंतर पुतणी करिना कपूरने केली पोस्ट, म्हणाली…
3 अरे बापरे! एकाच चित्रपटातून १४ नवोदित कलाकार करणार कलाविश्वात एण्ट्री
Just Now!
X