25 February 2021

News Flash

कंगनाच्या हाती येणार लव्हस्टोरीच्या दिग्दर्शनाची धुरा

'मणिकर्णिका'च्या दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे पेलल्यानंतर आता ती आणखी एका चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी सज्ज झाली आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना अभिनयानंतर दिग्दर्शनाकडे वळली आहे. तिनं दिग्दर्शित केलेला ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे पेलल्यानंतर आता ती आणखी एका चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी सज्ज झाली आहे. ती के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे.

या संबधीची चर्चा अजूनही पहिल्या टप्प्यात आहे. कंगना यासाठी अमेरिकेतून दिग्दर्शनाचे धडेही घेत असल्याचं समजत आहे. विजयेंद्र प्रसाद यांनी बाहुबली आणि मख्खी सारख्या चित्रपटासाठी काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यास कंगनाही खूपच उत्सुक आहे. ही प्रेमकथा इतर प्रेमकथेपेक्षा वेगळी असणार आहे हे नक्की.

कंगनाचा ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे कंगना दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटातील तिचा अभिनय आणि दिग्दर्शन कौशल्य पाहण्यास सगळेच उत्सुक आहेत. ‘मणिकर्णिका’ सोबतच कंगनाचा ‘मेंटल है क्या’ हा चित्रपटही पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 4:49 pm

Web Title: kangana ranaut directing a love story
Next Stories
1 प्रियांका-निकच्या नात्याबद्दल दीपिका म्हणते…
2 विवेक ओबेरॉय साकारणार पंतप्रधान मोदींची भूमिका?
3 होकार देण्यापूर्वी दीपिकानं रणवीरसमोर ठेवली होती ही सर्वात मोठी अट
Just Now!
X