पीटीआय, हैदराबाद / नवी दिल्ली

काँग्रेसचे ‘अंबानी आणि अदानीं’शी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बुधवारी प्रथमच केला. या उद्याोगपतींकडून काँग्रेसला टेम्पो भरून काळा पैसा मिळाल्याने राहुल गांधी यांनी त्यांच्या नावाने बोटे मोडणे रातोरात बंद केले का, असा सवालही मोदी यांनी केला. यावर राहुल गांधी यांनीही हिंमत असेल, तर अदानी-अंबानींकडे ईडी पाठवा असे प्रतिआव्हान दिले.

assembly elections 2024 Sc reservation Subclassification Grand Alliance Mahavikas Aghadi voting  print politics news
अनुसूचित जातीच्या मतांचे ध्रुवीकरण? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्याचा फटका
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
lawrence bishnoi brother anmol bishoi
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा सुगावा मुंबई पोलिसांना लागला; अनमोल बिश्नोई कोण?
fake branch of state bank open in Chhattisgarh
आमची कुठेही शाखा नाही!
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?
Anis Ahmed, Anis Ahmed Congress, Anis Ahmed latest news, Anis Ahmed marathi news,
अर्ज भरण्याची वेळ चुकवणारे अनिस अहमद पुन्हा काँग्रेसमध्ये
Gopal Shetty Borivali Vidhansabha Contituency
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची बंडखोरी की माघार? फडणवीसांना भेटून आल्यानंतर भूमिका काय?

पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांना लक्ष्य करण्यासाठी काँग्रेसकडून विशेषत: राहुल गांधी यांच्याकडून आतापर्यंत अंबानी-अदानींचा उल्लेख वारंवार केला जात होता. पंतप्रधान मोदी पाच मोठ्या उद्याोगपतींसाठी काम करतात, अशी टीकाही गांधी यांनी वारंवार केली. हा मुद्दा उपस्थित करत तेलंगणातील वेमुलावाडा येथील जाहीर सभेत पंतप्रधान म्हणाले, की राजपुत्रांकडून गेल्या पाच वर्षांपासून ‘अंबानी- अदानीं’चा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता. परंतु या मुद्द्यावर बोलणे राहुल यांनी अचानक का थांबवले? सौदा तर झाला नाही ना? याबाबत काँग्रेसने देशाला स्पष्टीकरण दिले पाहिजे. ‘‘राफेलचा मुद्दा फसल्यानंतर त्यांनी ‘पाच उद्याोगपतीं’बद्दल ठणाणा सुरू केला. मग अंबानी-अदानींचा जप सुरू केला. पण निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांनी (काँग्रेस) अंबानी-अदानींच्या नावाने खडे फोडणे बंद केले आहे,’’ अशी टीका मोदी यांनी केली.

हेही वाचा >>>काँग्रेसला अंबानी-अदानींकडून पैसा; पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल, राहुल गांधी यांच्या कथित मौनावर बोट

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. खरगे म्हणाले, की काळ बदलत आहे. मित्र आता मित्र राहिले नाहीत. तिसऱ्या टप्प्यानंतर मोदींनी आपल्याच मित्रांवर हल्ला सुरू केला आहे. त्यांचे स्थान डळमळीत झाल्याचे यावरून स्पष्ट होते. रमेश म्हणाले, ‘‘या निवडणुकीला असे वळण मिळाले आहे की, ‘हम दो हमारे दो’चे ‘पप्पा’ आपल्याच मुलांवर उलटे फिरले आहेत. पंतप्रधान आता स्वत:च्या सावलीलाही घाबरत आहेत.’’ मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वढेरा म्हणाल्या, ‘‘भाजपचे उद्याोगपतींशी संबंध असून त्या पक्षाने १६ लाख कोटींचे कर्जही घेतले आहे. भाजपची यंत्रणा राहुल गांधींविषयी खोटे पसरवण्यात व्यग्र आहे. राहुल आता अदानी-अंबानींचे नाव घेत नाही, असे ते म्हणतात, पण तो आणि आम्ही सर्वचजण दररोज अदानी-अंबानींबाबतचे सत्य मांडत असतो.

’’ निश्चितपणे काहीतरी संशयास्पद आहे. गेल्या पाच वर्षांपासून तुम्ही अदानी-अंबानींच्या नावाने ठणाणा करीत होतात. तुम्ही ते रातोरात थांबवले याचा अर्थ तुम्हाला टेम्पो भरून लुटीचा माल मिळाला आहे. काळ्या पैशांच्या किती बॅगा तुम्ही घेतल्या आहेत? तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान