संजीव कुळकर्णी
नांदेड : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर नंतरचे सर्वात महत्त्वाचे शहर अशी ओळख असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या विकासाचा दर ६.२९ टक्के इतका होता. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्याचा विकासदर वाढत असला तरी, उद्याोगवाढीची जोड त्याला देण्याची गरज आहे. त्यातूनच बेरोजगारीसारखी भेडसावणारी नांदेडची समस्या दूर होऊ शकेल.

२०२२-२३ मध्ये नांदेड जिल्ह्याची आर्थिक उलाढाल ३० हजार ७९० कोटी रुपयांपर्यंत झाली. त्यात वाढ होत ती एक लाख कोटींपर्यंत पोहोचवायची असेल तर पुढील पाच वर्षांत विकासाचा दर वाढवावा लागेल. २०२८ पर्यंत जिल्ह्याचे विकास निर्देशांक वाढत राहतील, पण हे सगळे करण्यासाठी कृषी, फळबागा, रेशीम शेती, पशुसंवर्धन आणि मुख्यत: उद्याोगावर भर द्यावा लागेल, असे नियोजन आखले जात आहे. गेल्या पाच वर्षांत नांदेड जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढते आहे. पण कृषीची उत्पादकता घटती आहे. अत्याधुनिक शेतीतील तंत्रज्ञान आणि पीक रचनेत बदल करून निर्देशांकात वाढ करण्याचे धोरण ठरविले जात आहे. मात्र, निर्देशांक वाढविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना पुरेशा ठरू शकल्या नाही.\

18 districts contribute only 20 percent to the economy of the state and Parbhani is included in these districts
राज्याच्या अर्थव्यवस्थेत एक टक्क्यांचे योगदान
praful patel
भाजप नव्हे, काँग्रेसमुळेच राष्ट्रवादी नेत्यांची बदनामी
Ajit pawar on chandrakant patil statement about sharad pawar
‘शरद पवारांचा पराभव हवा’, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर अजित पवारांची टीका; म्हणाले, “त्यांनी बारामतीत..”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
eknath shinde criticized uddhav thackeray
Lok Sabha Election 2024 : उबाठा आधीच ‘लीन’, आता त्यांना विलीन व्हायचे असेल – मुख्यमंत्र्यांची टीका
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Aarti Aale and Tejas Garge
दीड लाखांच्या लाच प्रकरणात पुरातत्त्व खात्याचे तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात, फरार तेजस गर्गेंचा शोध सुरु

हेही वाचा >>>ऐन उन्हाळ्यात साखर कारखान्यांचा शेतकऱ्यांना दिलासा; किती दिली एफआरपी?

नांदेड व कृष्णूर येथे काही उद्याोग सुरू आहेत. पण त्यांची संख्या बोटावर मोजता येईल इतपतच. फारसा रोजगार निर्माण न झाल्यामुळे बेरोजगारीचे मोठे आव्हान उभे आहे. शिक्षणाच्या बाबतीत हा जिल्हा पुढे जाणारा आहे. डॉ. श्रीकर परदेशी यांनी कॉपीमुक्ती, गुणवत्ता वृद्धी, पटपडताळणी आदी कार्यक्रम नेटाने राबविले. त्याचा चांगला फायदा झाला. मात्र, शालेय गुणवत्तेकडे लक्ष देण्याची आवश्यकता अजूनही असल्याचे पालक सांगतात.

जिल्ह्यात सचखंड गुरुद्वारा आणि माहूर हे शक्तीपीठ आहे. पण अर्थकारणाला वेग देण्यासाठी या तीर्थस्थळांचा उपयोग झाला नाही. त्याची वाढ, त्याचा धार्मिक विश्वस्त मंडळाच्या गतीने सुरू आहे.

गुरू-ता-गद्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि विमान या सुविधा सुरू करण्यात आल्या. पण विमानसेवा कधी सुरळीतपणे चालू राहिली नाही. त्यामुळे विमानतळ शोभेपुरतेच राहिले आहे. गोदाकाठी सिंचन सुविधा नीट उपलब्ध करून दिल्यास कृषी विकासाला अधिक गती येऊ शकते.