News Flash

नवीन वर्षाच्या सुरूवातीला कपिलने चाहत्यांना दिला ‘शुभ समाचार’

जाणून घ्या सविस्तर...

भारतात सर्वात लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेता म्हणून कपिल शर्मा ओळखला जातो. कपिलने सोमवारी एक ट्वीट केले होते आणि त्यामध्ये तो म्हणाला होता की उद्या तुम्हाला मी एक आनंदाची बातमी देणार आहे. आज अखेर ट्वीट करत कपिलने त्याच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या सुरूवातीला एक आनंदाची बातमी दिली आहे.

कपिलने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कपिलला ‘auspicious’ हा इंग्रजी शब्द उच्चारता येत नसल्याने तो प्रयत्न करताना दिसत आहे. कॅमेरासमोर आल्यावर शुट करताना ‘auspicious’ या शब्दावर कपिल अडखळतो. त्यानंतर कपिल बोलतो नेटफ्लिक्स देसी आहे तर जबरदस्ती इंग्रजीमध्ये बोलण्याची काय गरज आहे. तर, मी तुमच्या टीव्ही, लॅपटॉप आणि फोनवर येणार आहे, म्हणजेच नेटफ्लिक्सवर. “अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. मी येतोय नेटफ्लिक्सवर ही आहे ‘auspicious news’. “अशा आशयाचे कॅप्शन कपिलने तो व्हिडीओ शेअर करत दिलं आहे.

कपिलने जेव्हा ट्विट करून सांगितले होते की उद्या मी एक आनंदाची बातमी देणार आहे तेव्हा त्याच्या चाहत्यांच्या मनात बरेच प्रश्न आले होते. काही लोकांना वाटले की कपिल पिता होणार आहे किंवा त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव हे शुभ समाचार तर नाही ना? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते. पण कपिलने केलेल्या या ट्वीटमुळे सगळ्या लोकांच्या शंका आता दुर झाल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 7:23 pm

Web Title: kapil sharma struggles to pronounce word auspicious he is going to debut on netflix dcp 98
Next Stories
1 नुसरत यांचा ग्लॅमरस व्हिडीओ पाहून चाहते घायाळ
2 व्यसनी म्हणणाऱ्या महिला डॉक्टरला आर. माधवननं सुनावलं
3 बिग बॉसच्या घरात होणार राखी सावंतच्या नवऱ्याची एण्ट्री?
Just Now!
X