30 September 2020

News Flash

Confirm : ‘लाल सिंग चढ्ढा’मध्ये दिसणार आमिर-करीनाची जोडी

प्रसिद्ध हॉलिवूडपट ‘फॉरेस्ट गम्प’चा अधिकृत रिमेक करणार असल्याची घोषणा आमिर खानने केली होती.

आमिर खान, करीना कपूर

बॉलिवूडमध्ये ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून अभिनेता आमिर खान ओळखला जातो. आमिर खान चित्रपटांमधून प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच करत नाही तर, त्या माध्यमातून कायमच तो प्रेक्षकांना एक संदेश देतो. नकळतपणे प्रेक्षक आमिरच्या प्रत्येक भूमिकेशी जोडले जातात. वर्षभरात एकच चित्रपट हे गणित कसोशीने सांभाळणारा बॉलिवूड अभिनेता आमिर खान ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’नंतर कोणता चित्रपट करणार, याबद्दल अनेक तर्कवितर्क सुरू होते.

त्याच्या ५४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रश्नाचे उत्तर देत आमिर खानने सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला. प्रसिद्ध हॉलिवूडपट ‘फॉरेस्ट गम्प’चा अधिकृत रिमेक करणार असल्याची घोषणा आमिर खानने केली होती. ‘लाल सिंग चढ्ढा’ या नावाने हा रिमेक प्रदर्शित होणार आहे. मध्यंतरी या चित्रपटात करीना झळकणार असल्याच्या चर्चा होत्या. आता ही बातमी पक्की झाली आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीनाला बघायला चाहते उत्सुक आहेत. ‘बॉम्बे टाइम्स’च्या वृत्तानुसार, करीना कपूरने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारायला होकार दिला आहे. करीना आणि आमिरच्या चाहत्यांना हा खूप सुखद धक्का असणार आहे. या चित्रपटासाठी ‘वायकॉम १८’ ची सुद्धा मदत होणार आहे.

ही भूमिका करीनाने करावी अशी आमिरची इच्छा होती. आतापर्यंत ‘३ इडियट्स’, ‘तलाश’ अशा चित्रपटांमधून या जोडीची जादू अनुभवायला मिळाली आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 11:04 am

Web Title: kareena kapoor aamir khan lal singh chadhdha djj 97
Next Stories
1 Amrish Puri: भेदक डोळ्यांच्या व्हिलनला गुगलची मानवंदना!
2 चित्र रंजन : आत्मा हरवलेला रिमेक
3 #Super30 : ‘या’ मराठमोळ्या संगीतकारांच्या तालावर थिरकणार हृतिक
Just Now!
X