अभिनेत्री करीना कपूरचा लाडका लेक तैमुर कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या निरागस वागण्यामुळे तर कधी त्याच्या मस्तीखोर स्वभावामुळे. आज तैमुर लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. त्यामुळे तो कायमच चाहत्यांच्या चर्चेत असतो. विशेष म्हणजे त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास चाहतेदेखील उत्सुक असतात. अलिकडेच करीनाने सोशल मीडियावर तैमुरचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करीना किंवा करिष्मा अनेकदा तैमुरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, यावेळी करीनाने तैमुरचा एका वेगळ्या अंदाजातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तैमुर चाकावर मातीची भांडी तयार करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तैमुरचे हात मातीमध्ये माखले असून तो त्याच्या चिमुकल्या हातांनी मातीला आकार देताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याने एक लहानसं मातीचं भांडदेखील तयार केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, करीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तैमुरचे हे काही नवीन फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या तैमुरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोबतच त्याच्या बाललीला अनेकांच्या पसंतीत उतरत आहेत.