News Flash

‘हे’ आहे करिनाच्या फिटनेसचे रहस्य

ती योगा करण्याबरोबरच न चुकता जिममध्ये घाम गाळत असल्याचे दिसून येत आहे.

करिना कपूर

आपल्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री करिना कपूर आई झाल्यापासून तिचा जास्तीत जास्त वेळ तैमूरसोबत व्यतीत करताना दिसत आहे. मात्र या काळातही तिने तिच्या वर्कआऊटमध्ये कोठेही खंड पडू दिलेला नाही. ती योगा करण्याबरोबरच न चुकता जिममध्ये घाम गाळत असल्याचे दिसून येत आहे. याचंच एक उदाहरण देण्यासाठी तिच्या वर्कआऊटचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

करिनाच्या वर्कआऊटचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा पाऊस पडताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिची प्रशिक्षक नम्रता पुरोहित हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यामुळे करिनाचे वर्कआऊटप्रतीचे प्रेम सिद्ध होत आहे. करिनाच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटामध्ये करिना दोन भूमिका वठविणार असून त्यातील एका भूमिकेत ती ‘स्लिम अँड ट्रिम’ दिसणार आहे. तर दुस-या भूमिकेसाठी तिला वजन वाढवायचे आहे. यासाठीच करिना हे वर्कआऊट करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

नम्रताने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये करिना नम्रताबरोबर वर्कआऊट करत आहे. वर्कआऊट करण्यासाठी करिनाने काळ्या रंगाचा जिमसूट घातला असून या व्हिडिओला आतापर्यंत २३ हजारपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

करिना तिच्या प्रत्येक चित्रपटामध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसून येते. हा लूक मिळविण्यासाठी ती रोज योगा, व्यायाम, प्राणायम या प्रकारांचा आधार घेत असते. आगामी चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटामध्येही करिना तिच्या झिरो फिगरमुळे चर्चेत राहणार आहे यात कोणती शंका नाही. १ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया या अभिनेत्रीही झळकणार आहेत.

 

वाचा: बॉबी देओलचे झाले बारसे, सलमानने ठेवले ‘हे’ नाव !

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 11:01 am

Web Title: kareena kapoor pilate video viral share by her trainer
Next Stories
1 Royal Wedding : …म्हणून मेगनच्या ब्राइड्समेटच्या यादीतून प्रियांकाला वगळलं?
2 जवळपास दोन महिन्यांनंतर इरफान आलाय चाहत्यांच्या भेटीला…
3 बॉबी देओलचे झाले बारसे, सलमानने ठेवले ‘हे’ नाव !
Just Now!
X