News Flash

“शकडो सुपरस्टार येतील पण सैफ…”, करीनाने केली पतीची प्रशंसा

तिने एका मुलाखतीमध्ये असे म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे नेहमी चर्चेत असतात. हे कपल सोशल मीडियावर फारसं सक्रिय नसलं तरी अनेक मुलाखतींमध्ये बिनधास्तपणे त्यांची मते मांडताना दिसतात. नुकताच करीनाने एका मुलाखतीमध्ये पती सैफची प्रशंसा केली आहे.

करीनाने डेक्कन क्रॉनिकल्सला नुकतीच मुलाखत दिली. त्यावेळी ‘सैफ हा एक अष्टपैलू अभिनेता आहे. भविष्यात शेकडो सुपरस्टार होतील पण सैफसारखा कोणताही कलाकार नसेल. तो खूप वेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि प्रत्येक गोष्ट निवडताना तो वेगळ्या गोष्टींचा विचार करतो’ असे करीनाने म्हटले. दरम्यान तिने सेक्रेड गेम्स या सीरिजचा देखील उल्लेख केला आहे.

पुढे तिने ‘चित्रपटांमध्ये २५ वर्षे काम केल्यानंतर सैफने सेक्रेड गेम्समध्ये काम करत त्याचा अभिनयाचा एक वेगळा पैलू दाखवला’ असे म्हटले. त्यानंतर करीनाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार का असा देखील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने ‘मला आता अशी संधी मिळणार नाही आणि मला सध्या या प्लॅटफॉर्मकडे वळण्याचा विचार नाही’ असे म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 6:58 pm

Web Title: kareena kapoor says there will be hundreds of superstars but never another saif ali khan avb 95
Next Stories
1 डॉक्टरांची खिल्ली उडवणाऱ्या सेलिब्रिटी ट्रेनरचा करोनामुळे मृत्यू
2 ‘माझ्या फोटोवर वाईट कमेंट केली, तर’…; मुनमुन दत्तनं ट्रोलिंगविषयी मांडलं मत
3 मुंबईवर राज्य करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन मित्रांच्या शत्रुत्वाची गोष्ट, ‘मुम भाई’चा ट्रेलर प्रदर्शित
Just Now!
X