करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्राणघातक विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी जगभरातील वैद्यकिय तज्ज्ञ हँड सॅनिटायजरचा वापर करण्यास सांगत आहेत. सॅनिटायजरमध्ये अल्कोहोल असते. त्यामुळे करोनाचे विषाणू नष्ट होतात. परंतु अल्कोहोल तर दारुमध्ये सुद्धा असते मग दारु प्यायल्याने करोनाचा प्रादुर्भाव होत नाही का? असा प्रश्न अभिनेता कार्तिक आर्यनला पडला आहे. हाच प्रश्न त्याने डॉक्टरांना देखील विचारला. आता यावर डॉक्टर काय म्हणाले पाहुया…

खरंच दारु प्यायल्याने करोना विषाणू मरतो का?

दारु प्यायल्याने करोना विषाणूची लागण होत नाही या केवळ अफवा आहेत. असं डॉक्टर कार्तिकला म्हणाल्या. त्यानंतर त्याने आणखी काही प्रश्न विचारले जसे, उष्ण वातावरणात करोना नष्ट होतो का? लहान मुलांना करोना होत नाही का? चायनिस पदार्थ खाल्यावर करोना होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तर डॉक्टरने कर्तिकला दिली. या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करुन हा व्हिडीओ पाहू शकता.

करोना विषाणूसंबंधीत अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. दरम्यान काही अफवा सुद्धा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत लोकांचे प्रबोधन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कार्तिकने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.