जगभरातील शेकडो देश करोनाच्या संकटाला तोंड देत असतानाच ज्या चीनमधून करोनाचा उद्रेक झाला तेथेच आता (कु)प्रसिद्ध अशा ‘डॉग मीट फेस्टिव्हल’चं आयोजन केलं जात आहे. या फेस्टिव्हलला ते ‘युलिन फेस्टिव्हल’ असंही म्हणतात. यामध्ये कुत्र्यांना अमानुष मारहाण करुन मारले जाते आणि त्यांचे मांस शिजवून खाल्ले जाते. या फेस्टिव्हल विरोधात अभिनेता कार्तिक आर्यन याने आवाज उठवला आहे.

अवश्य पाहा – करोना ‘मास्क’ला हिंदीमध्ये काय म्हणाल?; बिग बींनी दिलेलं उत्तर पाहून चक्रावून जाल

कार्तिकने आपल्या पाळीव कुत्र्यांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. “दर वर्षी हे ‘युलिन फेस्टिव्हल’वाले माझं हृदय तोडतात.” अशा आशयाची कॉमेंट त्याने या फोटोवर केली आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अवश्य पाहा – “सर्वाधिक घराणेशाही बॉलिवूडमध्येच”; कुमार सानू यांनी व्यक्त केला संताप

 

View this post on Instagram

 

Har saal Dil Todte hain yeh Yulin Festival waale #YulinKMKB #StopYulin

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on

चीनमधील या ‘डॉग मीट फेस्टिव्हल’ विरोधात जगभरातून आवाज उठवला जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाऊ नये यासाठी प्राणी मित्रांनी आंदोलनही केलं होतं. मात्र त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. रॉयटर्सच्या वृत्तानुसार चीनच्या नैऋत्यला असणाऱ्या यूलीन शहरामध्ये डॉग मीट फेस्टिव्हलचे आयोजन दरवर्षी केलं जातं. दहा दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलच्या कालावधीमध्ये लाखो लोकं या शहराला भेट देतात. अनेकजण येथील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणारे लहान मोठ्या आकाराचे कुत्रे विकत घेऊन त्यांचे मांस खातात. करोनामुळे या वर्षी या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी असेल अशी आशा प्राणी मित्रांनी व्यक्त केली आहे.