News Flash

आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकवणार कतरिना

सध्या कतरिनाचे सिनेकरिअरही म्हणावे तसे जोर धरत नाही

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचे नाव आघाडीच्या कलाकारांमध्ये घेतले जाते. एवढ्या वर्षांचा सिनेसृष्टीतल्या अनुभवामुळेच कदाचित आता तिला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये बोलावले आहे. पुढच्या महिन्यात ऑक्सफर्डमध्ये होणाऱ्या एका सेमिनारमध्ये कतरिना बॉलिवूडचे प्रतिनिधीत्व करणार आहे. कतरिना तिथे स्टेज अॅण्ड स्क्रीन फिल्ड या विषयावर बोलणार आहे. कतरिनासोबत तिथे हॉलिवूड ऑस्कर पुरस्कार विजेता जेरेमी आयरन्स, रॉबिन राइट आणि अनालयने मेकरोड यांसारखे कलाकारही उपस्थिती राहणार आहेत.

दरम्यान, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये कतरिनाची ओळख करुन देताना बॉलिवूडमधली सगळ्यात महागडी अभिनेत्री अशी केली. यासोबत असेही सांगितले की कतरिनाने अनेक ब्रॅण्ड्ससाठी मॉडेलिंग केले आहे तसेच तिच्या आईचे रिलीफ प्रोजेक्ट इंडिया या नावाचे चॅरिटी ट्रस्टही आहे. कतरिना या ट्रस्टसाठीही सक्रिय असते. ही संस्था भारतातील महिला आणि मुलांच्या सुधारणेसाठी काम करते.

सध्या कतरिनाचे सिनेकरिअरही म्हणावे तसे जोर धरत नाही. ‘फितूर’ हा तिचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. यानंतर तिचा ‘बार बार देखो’ हा सिनेमाही आला. या सिनेमानेही प्रेक्षकांची निराशाच केली. पण लवकरच तिचा रणबीर कपूरसोबत ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा येत आहे. अनुराग बासुने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून स्वतः रणबीरने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

‘जग्गा जासूस’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा बदलण्यात आली असून सरतेशेवटी ७ एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रणबीर आणि कतरिनाच्या नात्यात आलेल्या दुराव्यानंतर या सिनेमाच्या वाटेत बऱ्याच अडचणी आल्या होत्या. रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेकअपला आता बरेच दिवस उलटले असूनही त्यांच्या नात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सकारात्मक बदल झाला नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच कतरिनाने रणबीरसोबत आगामी ‘जग्गा जासूस’ या सिनेमाचे प्रमोशन करण्यास नकार दिल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले होते.

कतरिनासोबत सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी रणबीरने कोणतीही हरकत दर्शविली नव्हती. पण, कतरिनाच्या या नकारामुळे तिला अजूनही झाल्या गोष्टींचा विसर पडला नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनसाठी कॅट कशा प्रकारे सहभागी होणार याकडेच अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 3:55 pm

Web Title: katrina kaif invited at oxford university know what will she teach
Next Stories
1 ‘मी बिग बॉसच्या घराला आग लावेन’
2 अश्विनी भावेच्या ‘मांजा’चा टिझर पोस्टर
3 जाणून घ्या, दिलीप प्रभावळकर यांच्या ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ मालिकेची कथा
Just Now!
X